श्रीवर्धन : भारत चोगले
श्रीवर्धन मध्ये घनकचरा प्रकल्पाचा कचरा झाला असून त्या घनकचरा प्रकल्पाच्या ठिकाणी मोठमोठे कच-याचे ढिग जमा झाले आहेत . कोणत्याही प्रकारे खत निर्मिती केली जात नाही . कचऱ्यामुळे तेथील नागरीकांच्या आरोग्याचा धोका निर्माण झाला आहे . तरी सुध्दा श्रीवर्धन नगरपरिषदेकडून ठेकेदाराला अभय दिले जाते. श्रीवर्धन तालुक्यामध्ये मोठा गाजावाजा करत घनकचरा प्रकल्पाचे उदघाटन तत्कालीन मंत्री ना . सुनिल तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले होते . परंतु नव्याचे नवदिवस उलटले आणि पुन्हा येरे माझ्या मागल्या हाच प्रकार दिसून येत आहे . उद्घाटन केल्यानंतर काही दिवस घनकचरा प्रकल्पासाठी कचरा उचलण्यात आला . परंतु त्यानंतर कच-याचे ढिग ठिकठिकाणी दिसून येत आहेत . गायगोठण या ठिकाणी साचलेला ओला आणि सुका कच-यामुळे परिसरामध्ये दुर्गंधी पसरलेली असून त्या ठिकाणी नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे . त्याकडे श्रीवर्धन नगरपालिकेचे अक्ष्यम दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे . याबाबत समस्त गायगोठणचे मधील नागरिकांने वारंवार केलेल्या लेखी व तोंडी तक्रारीला श्रीवर्धन नगरपरिषेदने केराची टोपली दाखविली आहे . श्रीवर्धन नगरपरिषदेकडून अक्ष्यम दुर्लक्ष केले जात आहे . ठेकेदाराला अभय दिले जात असल्याचे नागरीकांकडून बोलले जात आहे . श्रीवर्धन नगरपालीकने जो घनकचरा व्यवस्थापनांतर्गत खतनिर्मिती केंद्र कार्यान्वीत केले आहे . ते गेले काही महिने बंद स्थितीत असून संबधीत जागेत गेले काही महिन्यापासून संपुर्ण शहरातील कचरा जमा करण्याचे काम चालू आहे . त्या ठिकाणी सद्यस्थितीत शेकडो ट्रक कचरा जमा आहे . त्यावर कोणतेही प्रक्रिया केली जात नाही . त्या कचच्या घाणीच्या साम्राज्यामुळे संपुर्ण वस्तीमध्ये दुर्गंधी सुटत आहे . त्याच प्रमाणे पक्षाच्या विष्ठेचा त्रास पिण्याच्या पाण्याच्या ठिकाणांना व नागरिकांना होत आहे . त्यामुळे सध्या श्रीवर्धन शहरातील उत्तरेकडील भागातील नागरीक वस्तीमध्ये वेगवगळया रोगांचा प्रादुर्भाव होत आहे . त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धाका निर्माण झाला आहे . तसेच श्रीवर्धन शहरातील वाहतूक करणाच्या कच - याच्या गाड्यांवर कोणतेही झाकण नसते उघड्या गाडया कार्यान्वीत ठेवलेल्या आहेत . त्यामुळे घनकचरा प्रकल्पाच्या ठिकाणी कचरा नेत असतांना जाणा - या रस्त्याच्या दुतर्फा उडालेला कचरा व प्लास्टिक दिसून येत आहे . अशा प्रकार श्रीवर्धन नगरपालीका प्रशानाकडून शासनाच्या स्वच्छता अभियानाच्या मोहीमेस जाणून बुजून बगल देण्यात येत आहे . असे समस्त गायगोठण मधील नागरीकांचे म्हणणे आहे .
घनकचरा प्रकल्पाच्या गायगोठण या ठिकाणी श्रीवर्धन शहरातील कचरा उचलण्याचा ठेका संबधितीलच एका ठेकेदाराला श्रीवर्धन नगरपरिषदेने ठेका दिला होता . परंतु त्याच्या मनमानी कारभारामुळे कच-याचे ढिगच्या ढिग साचलेल्या दिसून येत होता . रोजच्या रोज परिसरातील कचरा उचलून तो कचरा घनकचरा प्रकल्पामध्ये नेवून त्यावर घनकचरा प्रकल्प करने क्रमप्राप्त आहे . मात्र रोजच्या रोज त्या कच-यावर प्रक्रिया न केल्यामुळे त्या ठिकाणी मोठमोठे पर्वतासारखे ढिगच्या ढिग पाहावयाला मिळत आहेत , त्यामुळे गायगोठण या परिसरामध्ये दुर्गंधी पसरली असून नागरिकांच्या आरोग्यावर त्याचा परिणाम होऊन त्या ठिकाणचे नागरिक त्रस्त झालले दिसत आहे . नगरपरिषदेच्या उदासीन कारभारामूळे घनकचरा प्रकल्पाचे ढिग साचले आहे . त्यावर प्रक्रिया केली जात नाही . श्रीवर्धन नगरपालीका संबधित ठेकेदाराला पाठीशी घालीत असून त्याला अभय दिले जात आहे असे श्रीवर्धन नागरिकांकडून बोलले जात आहे. या घनकचरा प्रकल्पाचा दोनदा बोजवारा उडाला असून तिस-यांदा तरी हा प्रकल्प टिकाव धरोल का अशी शंका नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे . घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प सुरू करण्यासाठी पहिल्यांदा निविदा १७ जानेवारी २०१३ रोजी काढण्यात आली होती . त्यासाठी एक मोठी मशिनरी आणि खत प्रकल्प चालविणे तसेच मशिन शेड या कामासाठी ६१ लाख ७० हजार पाचशे रूपये किंमतीला ठेका देण्याचे ठरविण्यात आले होते . त्याची तांत्रिक मंजुरी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यकारी अभियंता नागरी व ग्रामीण विभाग माणगाव यांच्या कडून दि . २२ फेब्रुवारी २०१३ रोजी मंजूर मिळाली होती .
पावसाळा अगदी काही दिवसांवर येवून राहिला आहे . याची कल्पना श्रीवर्धन नगरपरिषदेला दिली आहे . श्रीवर्धन मधील घनकच - याच्या ठिकाणी मोठमोठे ढिगच्या ढिग पडलेले आहेत . तेथील नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे . पावसाळयापुर्वी या कच-याची विल्हेवाट योग्यपणे लावली गेली नाही तर याचा विपरीत परिणाम शहरामध्ये होऊन रोगराई पसरली जाईल . श्रीवर्धन नगरपरिषदेने तातडीने दखल घ्यावी.
-प्रितम श्रीवर्धनकर , श्रीवर्धन नगरपरिषद विरोधी पक्षनेते .
श्रीवर्धन नगरपालिका प्रशासनाकडून शासनाच्या स्वच्छता अभियानाच्या मोहीमेस जाणूनबुजून बगल देण्यात येत आहे , ऐन पावसाळयामध्ये नागरीकांना मोठ्या संकटांना सामोरे जावे लागणार आहे . यामुळे मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान तर होईलच शिवाय आरोग्याचा मोठा प्रश्न निर्माण होणार आहे.
- अनंत गुरव , नगरसेवक .
घनकचरा व्यवस्थापन हा प्रकल्प नसून त्याठिकाणी डम्पीग ग्राउंड तयार झालेला आहे . तेथे कचयाचे मोठमोठे डोंगर तयार झालेले आहेत . या ठिकाणी कुठलीही खतनिर्मिती होत नाही . त्या ठिकाणचे वातावरण पूर्णपणे दृषित झालेले आहे . त्यामुळे तेथील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे . याकडे कोणही लक्ष देत नाही . पिण्याचे पाणी सुध्दा दूषित झालेले आहे . जागृत निळेश विरकुड , जागृत नागरिक
श्रीवर्धन नगरपरिषेदमधील घनकचरा प्रकल्पासाठी शासनाने दिलेल्या अपु-या सुविधा , प्रशासकीय मान्यता वेळीच दयायला पाहिजे होत्या ते न दिल्यामुळे तसेच त्यांच्यामध्ये होणारी दिरंगाई सक्षम नसलेले ठेकेदार अशा अनेक अडीअडचणीमुळे वाईट परिस्थिती निर्माण झाली आहे .
-वसंत यादव , श्रीवर्धन तालुका शेकापचे चिटणीस

إرسال تعليق