श्रीवर्धन मध्ये मराठी नववर्षाचे जल्लोषात स्वागत : "मराठी संस्कृती प्रतिष्ठान" कडून विविध कार्यक्रमांचे आयोजन



सर्वसामान्य व्यक्तीच्या कर्तृत्वाला साद घालणे महत्वाचे ...
-प्रशांत शिंदे ( संस्थापक अध्यक्ष मराठी संस्कृती प्रतिष्ठान )

 श्रीवर्धन प्रतिनिधी संतोष सापते

रायगडच्या भूमीत जगाला जिंकण्याची  शिकवण आहे .मराठी व्यक्ती आज सर्व क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाने ओळखला जातो .ग्रामीण भागातील तरुणांना मध्ये  प्रचंड क्षमता असते फक्त गरज असते त्या क्षमता असणाऱ्या व्यक्तीच्या कर्तृत्वाला साद घालण्याची ते काम मराठी संस्कृती प्रतिष्ठान नियमित करते असे प्रतिपादन प्रशांत शिंदे यांनी केले .
मराठी संस्कृती प्रतिष्ठान ची स्थापना 2005 मध्ये झाली .तेव्हा पासून विविध समाजा उपयोगी कार्य आपण केले आहे .गणेश मूर्ती पुनश्च विसर्जन ,रक्तदान शिबीर, पर्यावरण साठी वृक्षारोपण , श्रमदानातून बंधारे बांधणे,स्वच्छता मोहीम, नेत्रदान, त्वचा दान ,गुणवंत विदयार्थी सत्कार, दिवाळी प्रसंगी दीपोत्सव व जेष्ठनागरिक सन्मान  अशा कामातून आम्ही समाज सेवा करत आहोत .असे शिंदे यांनी सांगितले .सदरच्या कार्यक्रमात सचिन नाक्ती ,अविनाश मोरे ,प्रसाद विचारे व ह भ प वाघे यांचा उत्कृष्ट कार्यकर्तृत्वा बद्दल सन्मान करण्यात आला .श्रीवर्धनचे उपनगराध्यक्ष जितेंद्र सातनाक यांनी सर्व सत्कार मूर्ती चे अभिनंदन करत भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या . नृत्य स्पर्धेस सुरवात होण्या पुर्वी रितेश  मुरकर यांच्या स्वरगंधर्व संस्थेचा गायनाचा कार्यक्रम झाला .
श्रीवर्धन शहर रूढी परंपरांचे पालन करण्यात अग्रेसर आहे .श्रीमंत बाळाजी विश्वनाथ भट यांची जन्मभूमी असलेल्या श्रीवर्धन मध्ये गुढीपाडवाला सर्वसामान्य माणूस पारंपरिक वेशभूषा करून सोमजाई मंदिरा जवळ जमतात .प्रभू रामचंद्र यांची प्रतिमा विधिवत पूजा करून बैलगाडीत  ठेवली जाते .नारळाच्या फांद्या व इतर साहित्याने बैलगाडी सजवली जाते . पारंपरिक वाद्य, वेषभूषा,  ढोल व लेझीम  या वर लहान थोर नृत्य करत सोमजाई मंदिर , शिवाजी चौक ,कसबा पेठ ,प्रभू आळी ,ते पेशवे स्मारक पर्यंत येतात .मराठी संस्कृती प्रतिष्ठानचे सभासद भगवे फेटे बांधून सदरच्या मिरवणुकीचे सारथ्य करतात .   पेशवे स्मारकाच्या प्रांगणात आल्यावर विधिवत पूजा अर्चा संपन्न केली जाते .मराठी प्रतिष्ठान प्रत्येक वर्षी गुढीपाडवाला विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करते .महिला, लहान मुले यांना कार्यक्रमात प्राधान्य दिले जाते.
गुढीपाडवा हा हिंदू धर्मातील अतिशय महत्वाचा उत्सव मानला जातो .
श्रीवर्धन शहरातील प्रत्येक घरावर गुढी उभारली गेली .निसर्गात होणारा बदल , आध्यात्मिक महत्व व परंपरा यांचा अनोखा अविष्कार गुढीपाडवा मानला जातो . होळी नंतर कोकणात मोठ्या भक्ती भावाने व श्रद्धेने गुढीपाडवा साजरा करण्यात योयकेला जातो .श्रीवर्धन शहरात  कैलारू घरावर भगवे वस्त्र ,कडुनिंबाचा पाला ,झेंडूचा हार ,तांब्याचा तांब्या व बांबू ची काठी सर्वत्र फडकतांना निदर्शनांस आली .शहरातील लोकांनी  सकाळी लवकर गुढी उभारून तिची विधिवत पूजा करून नैवेद्य अर्पण केला .हा सण मांगल्य व नवनिर्मिती चा संदेश देणारा उत्सव मानला जातो .
मराठी संस्कृती प्रतिष्ठान च्या गणेश सावंत , व रितेश मुरकर  यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले .मराठी संस्कृती  प्रतिष्ठानचे   अध्यक्ष रशीष माने ,  सभासद  सुनील दर्गे ,कृष्णा रटाटे ,अमर गुरव ,स्वप्नील भुसाने दिलीप सावंत, परेश बोले,बाळा वाणी  व इतर सभासदांनी आयोजनात महत्वाची भूमिका बजावली आहे.


मराठी संस्कृती  प्रतिष्ठान आयोजित  नृत्य स्पर्धेत जय हनुमान उरण
ग्रुप प्रथम क्रमांकाचे विजेते ठरले .
मी डान्स ग्रुप द्वितीय पेजारी
माणगाव ग्रुप तृतीय व   नटेश्वर ग्रुप व  के के ग्रुप  ला उत्तेजनार्थ  बक्षीस मिळाले .

Post a Comment

أحدث أقدم

नक्की वाचा