विकासासाठी तटकरेंना दिल्लीला पाठवा : आ. अनिकेत तटकरे यांचे आवाहन



प्रतिनिधी : म्हसळा लाईव्ह
आगामी होऊ घातलेल्या लोकसभा निवडणूक प्रचारासाठी काँग्रेस मित्रपक्ष आघाडीचे रायगड लोकसभा उमेदवार सुनील तटकरे यांचा निवडणुक प्रचारासाठी म्हसळा तालुका शहरात जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन आमदार अनिकेत तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले . या प्रसंगी अनिकेत तटकरे यांनी काँग्रेस , राष्ट्रवादी काँग्रेस आणि शेतकरी कामगार मित्र पक्षाचे कार्यकत्यांनी म्हसळा शहरात लोकसभा निवडणुकीत आपले लाडके उमेदवार सुनील तटकरे यांना भरघोस मतांनी निवडून आणण्यासाठी केलेले मनोमिलन आणि आजची एकजुट विजयश्री खेचून आणणार आहे . रायगडसह कोकणाचा रखडलेला सर्वांगीण विकास करण्यासाठी सुनिल तटकरे यांना दिल्लीला पाठविण्याचे आवाहन आमदार अनिकत तटकरे यांनी म्हसळा तालुका शहरात निवडणुका संपर्क कार्यालयाचे उद्घाटन कार्यक्रमात संबोधीत करताना व्यक्त केले . या वेळी त्यांच्या समवेत समिर बनकर , डॉ . मुविज शेख मुसद्दीक इनामदार , उपसभापती संदीप चाचले , चंद्रकांत कापरे आदि मान्यवर उपस्थित होते . या प्रसंगी कार्यकत्यांना मार्गदर्शन करताना अनिकेत तटकरे यांनी खासदार अनंत गीते यांचा चांगलाच समाचार घेतला . कोकणचे भाग्यविधात महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री बॅ. अंतुले साहेबांच्या नावाचा वापर करून गीतेंना मत मागण्याची वेळ आली हे तुम्ही गेल्या ३० वर्षात काडीचाही विकास ने केल्याचे फळ असल्याची आठवण अनिकेत तटकरे यांनी आवर्जून करून दिली . त्यांनी पुढे सांगितले की बँ. अंतुले हे महान नेतृत्व होते स्व . इंदिराजी गांधी यांच्या सहवासात . अंतुले यांनी काँग्रेस पक्षाला मजबूत बळ दिला , दूरदृष्टी असल्यामुळे पुढील पन्नास वर्षाचा विकास आणि योजना त्यांनी मंजूर करून घेतल्या . एवढे महान नेतृत्व असतानाही त्यांनी कधीही जातीपातीचे राजकारण केलं नाही याउलट विरोधकांनी मात्र सातत्याने समाजासमाजात तेढ़ वाढवून राजकारण केले त्यांना धडा शिकविण्याची वेळ आता जवळ आली असल्याने आणि कोकणाच्या सर्वांगीण विकासाचे अपुरे राहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी आघाडीचे उमेदवार सुनिल तटकरे यांना विक्रमी मताधिक्याने निवडून देण्याचे आवाहन अनिकेत तटकरे यांनी या निमित्त केले काँग्रेस - शेकाप - राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि कवाडे गट यांची ही युती अभेद्य अशी आघाडी असून आपापसातील छोटे - छोटे वाद बाजूला सारून सुनिल तटकरे यांच्या विजयाचा बुलंद आवाज लोकसभत पाठविण्यासाठी सर्वांनीच जोमाने कामाला लागून प्रचंड मताधिक्याने सुनिल तटकर यांना विजयी करण्याचे आवाहन आ. अनिकेत तटकरे यांनी यावेळी केले . 

Post a Comment

أحدث أقدم

नक्की वाचा