लग्नसराईलाही बसणार आचारसंहितेचा फटका



टीम म्हसळा लाईव्ह
लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असून  एप्रिल - मे महिन्यात होणा - या निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू झाली आहे . याचा फटका एप्रिल , मे महिन्यात होणा-या लग्नसराईला बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे . लग्नाच्या खरेदीसाठी सोक्त मोठी रक्कम ठेवणे डोकेदुखी ठरू शकते . यासाठी खबरदारी घ्यावी लागणार आहे . लोकसभा निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे . आचारसंहितेचा कोणत्याही प्रकारे भंग होऊ नये, यासाठी पोलीस प्रशासन खबरदारी घेत आहे . रायगड जिल्ह्यात अनेक ठिकाणी पथके तैनात केली असून त्यांच्यामार्फत वाहनांची तपासणी करण्यात येत आहे . आचारसंहितेनुसार १० हजारांहुन अधिक रक्कम सोबत बाळगल्यास त्याबाबतची कागदपत्रे असणे आवश्यक आहे. अधिकाऱ्यांनी विचारणा केली असता योग्य कागदपत्रे सादर केल्यास कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात येणार नाही . मात्र , कागदपत्रे नसल्यास त्यांना चौकशीला सामोरे जावे लागल . योग्य कागदपत्रे नसल्यास रक्कम जप्त करण्यात येणार आहे . जिल्ह्यातील ग्रामीण भागातून अनेक नागरिक शहरामध्ये खरेदीसाठी येतात . लग्नासाठी सोने , कपडे , भांडी , खरेदीसाठी मोठी रक्कम सोबत घ्यावी लागते . यावेळी आगामी दोन महिने अशी मोठी बाळगतान खबरदारी घ्यावी लागणार आहे . अधिक रक्कम असल्यास बँकतुन काढल्याची पावती अथवा एटीएम मधून घेतल्याची पावती सोबत ठेवावी लागणार आहे . सामान्य लग्नाबाबत परवानगी घेण्याची आवश्यकता नाही, परंतु लग्नाला राजकीय नेते उपस्थित राहणार असतील तर खबरदारी घ्यावी लागेल . 

खरेदीसाठी जाणाऱ्यांना फटका...आचारसंहितेची अंमलबजावणी करण्यासाठी जिल्ह्याच्या सीमेवर व शहरांच्या सिमेवर नाके उभारले आहेत . शहरात व महामार्गावरून जाणा-या येणा-या वाहनांची तपासणी करण्यात येत आहे . खरेदीसाठी सोबत घेतलेल्या पैशाबाबतची कागदपत्रे अधिका - यांना सादर करावी लागतील , यात संबंधिताला मनस्ताप होवू शकतो.

Post a Comment

أحدث أقدم

नक्की वाचा