रायगड लोकसभा : महायुतीचे उमेदवार अनंत गीतें साठी दादर येथे भाजपाची प्रचार नियोजन सभा संपन्न.

प्रतिनिधी म्हसळा लाईव्ह
बुधवार दिनांक १० एप्रिल, २०१९ रोजीं सांयकाळी ७ वाजता दादर भाजपा कार्यालय, भारतीय जनता पार्टी कोकण विकास आघाडी मुंबई मार्फत भाजपा शिवसेना महायुतीचे ३२ रायगड लोकसभा मतदार संघाचे उमेदवार केंद्रीय मंत्री मा.श्री अनंत गीते  यांच्या प्रचारासाठी नियोजन सभा मा.श्री.कृष्णा कोबनाक अध्यक्ष श्रीवर्धन विधानसभा भाजपा यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली.  
या बैठकीत मार्गदर्शन करताना आपले पवित्र मत देण्याकरीता गावाकडे चला असे आवाहन केले.  फीर एक बार मोदी सरकार!  देशात पुन्हा मोदी सरकार येणार आहे व मंत्रीमंडळात रायगड चा शिलेदार असला पाहिजे या करीता मा.श्री. अनंत गीते साहेबांना प्रचंड मतांनी विजयी करा असे आवाहान करण्यात आले. या बैठकीला अॅड. संदिप महाडीक, श्री रमेश पोटले, मदन वाजे,  गोविंद भायदे,  रघुनाथ भायदे, उददे्श म्हात्रे, नामदेव शितकर, प्रदिप साळवी, वैभव कदम, देवीदास बांद्रे,  कृष्णा होडे असे अनेक पदाधिकारी व  कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

Post a Comment

أحدث أقدم

नक्की वाचा