रायगड लोकसभा : रायगडात १० दिवस राजकीय तोफा धडाडणार : पक्षांचे प्रमुख रायगडात

प्रतिनिधी म्हसळा लाईव्ह
छत्रपती शिवाजी महाराजांचे वास्तव महाड येथील रायगड किल्ल्यावर होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील तोफा त्या वेळी धडाडत असत. आता प्रत्यक्षात तोफा धडाडत नसल्या तरी राजकीय तोफा मात्र निवडणुकीच्या माध्यमातून धडाडू लागल्या आहेत. लाकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असल्यामुळे आरोपांच्या फैरी सुरू आहेत. राजकीय पक्षांच्या प्रमुखांच्या तोफा येत्या १० दिवसात रायगड जिल्ह्यात धडाडणार आहेत.

रायगड लोकसभा मतदारसंघात राजकीय वातावरण तापू लागले आहे. युती व महाआघाडीच्या पदाधिका-यांसह कार्यकर्त्यांनी जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे. प्रचाराच्या पहिल्या टप्प्यात कार्यकत्यांनी मेळावे घेतले. दुस-या टप्प्यात गुप्त बैठका व विभागवार बैठका घेण्याकडे श्रीवर्धन उमेदवारांचा कल आहे. प्रचाराच्या पुढील टप्प्यात लोकसभा मतदारसंघात स्टार प्रचारकांच्या तोफा धडाडणार आहेत. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे , शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस जयंत पाटील, रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या सभांचा समावेश आहे. रायगड लोकसभा मतदारसंघात १६ उमेदवार नशीब अजमावित असून २३ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. मात्र प्रमुख लढत शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गीते व काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेस - शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार राष्ट्रवादी काँग्रसेचे सरचिटणीस सुनील तटकरे यांच्यात होणार आहे. अनंत गीते व सुनिल तटकरे या दोन्ही उमेदवारांनी निवडणूक जाहीर होण्यााधीच तयारी सुरु केली होती. त्या दृष्टीने ठिकठिकाणी पक्षाच्या कार्यकर्त्यांचे मेळावे पार पडले. निवडणूक जाहीर झाल्यानंतर ते उमेदवारी अर्ज दाखल करेपर्यंत बुथ कार्यकर्त्यांच्या बैठका, सभा घेण्यात आल्या. त्यानंतर विभागवार बैठका तसेच मतदारांच्या घरोघरी जाऊन प्रचार करण्यावर उमेदवारांसह युती व महाआघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते भर देत आहेत. यामुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण महाड तापण्याबरोबरच आरोप - प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. मतदानाला केवळ १२ दिवस शिल्लक राहिले असून पुढील दिवसांमध्ये दापोली जास्तीत जास्त मतदारांकडे पोहचण्यासोबत स्टार प्रचारकांच्या सभा घऊन मतदारांवर प्रभाव पाडण्याची रणनीती उमेदवारांनी आखली आहे. त्यानुसार पुढील काही दिवसात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार , शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे, रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण लोकसभा मतदारसंघात सभा घेणार आहेत. सुनिल तटकरेंच्या प्रचारासाठी शरद पवार अलिबागमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस सुनिल तटकरे हे महाआघाडीकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत . तटकरे यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, अलिबागमधील समुद्रकिनारी असणा-या गुहागर जे . एस . एम . क्रीडांगणावर जाहीर सभा घेणार आहेत. या सभेला शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटीलही उपस्थित राहणार आहेत. या दोन नेत्यासंह राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शेतकरी कामगार पक्षाचे नेते पदाधिकारी उपस्थित रोहतील. मोदी मुक्त भारतसाठी राज ठाकरे रायगडच्या आखाड्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधी भूमिका घेत भाजप - शिवसेना युतीविरोधात राण उठविले आहे. युतीविरोधात आपण राज्यात ठिकठिकाणी सभा घेणार असल्याचेही त्यांनी यापूर्वी जाहीर केले आहे . त्यानुसार राज ठाकरे १९ एप्रिल रोजी दक्षिण रायगडमध्ये जाहीर सभा घेणार आहेत. या सभेत राज ठाकरे पंतप्रधान मोदींसह युतीवर शिरसंधान साधणार असून या सभेचा महाआघाडीचे उमेदवार सुनील तटकरे यांना फायदा होणार असल्याचे चित्र दिसून येते.  माणगावात युतीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरेंसह रायगडचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण हे शिवसेनेचे उमेदवार अनंत गीते यांच्या प्रचारासाठी माणगावमध्ये १७ एप्रिल रोजी सभा घेणार आहेत. या सभेत उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेना - भाजपचे मंत्री सभेत उपस्थित राहणार आहेत. यासह रायगडचे पालकमंत्री रविद्र चव्हाण लोकसभा मतदारसंघात ठिकठिकाणी विभागवार सभा घेणार आहेत. यासह शिवसेना नेते तथा पर्यावरण मंत्री रामदार कदम अनंत गीतेच्या प्रचारासाठी लोकसभा मतदारसंघात सभा घेणार आहेत. 

Post a Comment

أحدث أقدم

नक्की वाचा