प्राथमिक शिक्षक श्री. जयसिंग शंकर बेटकर इंडियन आयकाॅन अवाॅर्डनी सन्मानित



प्रतिनिधी : म्हसळा लाईव्ह
                दि. ७ एप्रिल २०१९ रोजी सायंकाळी ५ वा. स्थळ शिरोडकर सभागृह, के.ई.एम. हाॅस्पिटल जवळ, परेल (पुर्व) मुंबई येथे विविध क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतलेल्या मान्यवरांचा सन्मान सोहळा उत्साहात पार पडला.
               यावेळी कला, क्रिडा, सांस्कृतिक, सामाजिक, उत्तम पत्रकार, कृषी, उद्योग, सामाजिक संस्था, कार्यकारी मंडळ, शैक्षणिक क्षेत्र, उत्तम मिडिया इ. विविध क्षेत्रांत विशेष कार्य करणाऱ्या व्यक्तींना इंडियन आयकाॅन अवाॅर्ड देऊन गौरविण्यात आले.
               यावेळी रायगड जिल्हयातील म्हसळा तालुक्यातील प्राथमिक शिक्षक श्री. जयसिंग शंकर बेटकर यांनी चालू शैक्षणिक वर्षात उत्तम प्रकारे विविध उपक्रम राबविले. सांस्कृतिक कार्यक्रम, विज्ञान प्रदर्शन, विद्यार्थ्यांसाठी क्रिडा, चित्रकला स्पर्धेसाठी तालुका, जिल्हा स्तरावर भरीव मार्गदर्शन, गरजू विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य वाटप, लोक सहभागातून चांगले योगदान, समाज जनजागृतिचे कार्यक्रम, अंधश्रद्धा निर्मुलनासाठी जनजागृति कार्यक्रम, असे अनेक उपक्रम, सहशालेय उपक्रम यशस्वी राबविल्याबद्दल श्री. बेटकर सर यांना इंडियन आयकाॅन अवाॅर्ड  (शिक्षण विभाग) क्षेत्राचा देऊन गौरविण्यात आले.यावेळी सोबत प्रकाश बेटकर,संजय वाघे,सिध्दांत शिंदे,प्रणव बेटकर उपस्थित होते आणि प्रमुख पाहुणे व संस्थेचे पदाधिकारी होते.

Post a Comment

أحدث أقدم

नक्की वाचा