सुनील तटकरे आणि शेकापचे जयंत पाटील यांची संस्थाने खालसा करणार -अनंत गीते



म्हसळा वार्ताहर
2014 च्या लोकसभा निवडणुकीत माझा 2100 मातांनी निसटता विजय झाला होता या वेळी माझा विजय एक लाख मतांच्या फरकाने होणार आहे मी निवडून आल्यावर एक निर्धार केला आहे रायगड जिल्ह्यात असलेले सुनील तटकरे व शेकापचे जयंत पाटील यांची संस्थाने खालसा केल्याशिवाय मी गप्प बसणार नाही असा जाहीर निर्धार भाजप सेना युतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी मेंडदी आगरी समाज भवन समोर झालेल्या जाहीर सभेत व्यक्त केला.यावेळी गीते यांनी ही निवडणूक सदाचार विरुद्ध भ्रष्टाचार अशी असून तटकरे यांनी 70 हजार करोड रुपयांचा भ्रष्टाचार केलेला आहे याचं निकाल काही दिवसातच लागणार असून यांची अवस्था छगन भुजबळ यांच्यासारखी होणार असल्याचे सांगितले. सुनील तटकरे हे माझे प्रतिस्पर्धी उमेदवार असले तरी ते जसे शरद पवारांनी माढा मधून माघार घेतली तशी माघार उमेदवारी अर्ज मागे घेण्याचे वेळे पर्यंत घेतील कारण त्यांनी त्यांच्या मुलीचा दाखल केलेला उमेदवारी अर्ज डमी नसून अपक्ष आहे याची शक्यता नाकारता येत नाही.त्यांनी मागील वेळी 200 कोटी खर्च करून पडण्यासाठीच वाया घालवले तसे आताही भ्रष्टाचारात कमावलेला पापाचा पैसा तुम्हाला आमिष देण्याचा प्रयत्न करतील त्या पैशांना कोणीही हात लावू नका नाहीतर हात लावणाऱ्यांचा वाटोळा होईल असेही आवेशपूर्ण सांगितले।.निवडणुकीत मतदारांनी तटकरेंचे पैसे घेऊ नये यासाठी सभेला उपस्थित असलेल्या जनसमुदायकरवी दोन हात उंचावून अनंत गीते यांनी  शपथ वदवून घेतली. यावेळी या सभेला त्यांनी अलिबाग तालुक्यातील कुसुबळे येथील सभेचा उदाहरण देताना त्या सभेत मी भाषण करताना एक घोणस नावाचा साप घुसला त्या सापाला तेथील एक नागरिकाने ठेचून मारला तसाच येत्या निवडणुकीत 23 तारखेला सुनील तटकरे यांना ठेचायचे आहे हे सापापेक्षा विषारी साप असल्याचा फुत्कार अनंत गीते यांनी सुनील तटकरे यांच्यावर सोडला. त्याचप्रमाणे मागील निवडणुकीत सुनील तटकरे यांनी माझ्या समोर उभे राहून माती खाल्ली यावेळी त्यांना माती बरोबर धूळ खायला लावू अशा प्रकारचे वक्तव्य केले.सुरवातीला सभेत खूपच कमी जनसमुदाय जमल्याने अनंत गीते यांनी व्यासपीठावरून खाली उतरून सभा घेण्याचा निर्णय घेतला .मागील लोकसभा निवडणुकीत माझा अल्प मातांनी झालेला विजय हा सुलतान मुकादम,उस्मान रोहेकर यांच्या मुळे झाला ते आता माझ्या सोबत असल्याने आता माझा विजय लाख मतांनी होणार असा विश्वास व्यक्त करताना नाविद अंतुले यांची स्तुती अनंत गीते यांनी करताना मागील वेळी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि बॅरिस्टर ए आर अंतुले हे दोन ध्रुव होते यावेळी नाविद अंतुले आणि उद्धव ठाकरे हे दोन ध्रुव एकत्र आलेत ही माझ्या जमेची बाजू असल्याचे गीते यांनी सांगितले. जयंत पाटील आणि सुनील तटकरे यांच्यावर अधिक पणे टीका करताना त्यांच्याशी माझे व्यक्तिगत दुश्मनी नसली तरी वैचारिक मतभेद असल्याने शेकाप आणि राष्ट्रवादी यांचे नेते माझ्या सोबत नसले तरी त्यांचे मतदार माझ्यासोबत असल्याचा दावा यावेळी गीते यांनी केला.विकासा बाबत गीते यांनी एक अवाक्षरही काढला नाही.यावेळी सभेला अनंत गीते यांच्या समवेत जिल्हा प्रमुख रवी मुंडे,भाजप उपाध्यक्ष कृष्णा कोबनाक, संजय कोनकर,नंदू शिर्के ,शैलेश पटेल,श्रीमती करंजेकर, नाविद अंतुले,उस्मान रोहेकर,सुलतान मुकादम, महादेव पाटील, आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी वारळ येथील मुस्लिम युवकांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला.

Post a Comment

أحدث أقدم

नक्की वाचा