रायगडचा खासदार कसा नसावा या निकषांत शिवसेना उमेदवार अनंत गिते यांचा लागला नं.१



राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुनील तटकरे ना म्हसळा करानी केले नापास

तटकरेंच्या भ्रष्टाचारावर उमेदवार गीतेंसह सर्वानी केली वीखारी टिका

संजय खांबेटे : म्हसळा 

   रायगड लोकसभेची निवडणूक अतीशय  चांगली आहे व ती माझ्या दृष्टीने भष्ट्राचार  विरुध्द सदाचार याच. प्रमुख मुद्दावर असल्याचा महायुतीचे रायगड लोकसभेचे उमेदवार अनंत गिते यानी म्हसळा येथील श्री धाविरदेव पटांगणात  झालेल्या प्रचार सभेत सांगितले. यावेळी जिल्हाप्रमुख रवि मुंडे, भाजपाचे उपाध्यक्ष कृष्णा कोबनाक , माजी.आ. तुकाराम सुर्वे, श्रीमती करंजे, सरोज म्हशीलकर ,नाविदभाई अंतुले, संजय कोनकर, महादेव पाटील, सुलतान मुकादम, उस्मान रोहेकर , नंदू शिर्के आदी उपस्थित होते.
    म्हसळा येथील सभेला हिंदू मुस्लीम मतदारानी प्रचंड गर्दी केली होती, लावली प्रचार सभा आणि झाली विजयाची सभा असे गीते यानी आजच्या गर्दीचे  कौतुक केले , माझ्या मागील सर्व काळातील ही सर्वश्रेष्ठ सभा आसल्याचे गिते यानी सांगून. म्हसळा करानी दिलेल्या प्रेमा बद्दल कौतुक केले.
    भष्ट्राचार  विरुध्द सदाचार याच प्रमुख मुद्दावर या वेळी रायगड लोकसभा निवडणुक होणार हे गीते यानी स्पष्ट करीत आम्ही भाजपा, रिपब्लीकन अशी महायुती घट्ट आहे , अलिबाग, पेण व श्रीवर्धन विधान सभा क्षेत्रात प्रत्येकी १० सभा झाल्या कार्यकर्त्यांच्यात उत्साह आहे. यावेळी प्रचंड मताधिक्क्याने विजय माझाच आसल्याचे गीते यानी सांगितले.
   तटकरेच्या भ्रष्टाचारावर तोंडसुख
अलिबाग कुसुंबळे येथील सभेचे वर्णन व त्यात आलेला साप व श्रोत्यानी त्या विषारी सापाला ठेचल्याची गोष्ट सांगत या निवडणुकीत भ्रष्टाचारी सापाला रायगडचा मतदार ठेचणार असल्याचा  गीते यानी सांगितले. तटकरे यांच्या ७० हजार कोटी च्या सिंचन घोटाळ्याचा निकाल अंतीम टप्प्यात आहे. राष्ट्रवादीच्या दोन नेत्याना कधीही अटक होऊ शकते असे राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत दादा पाटील यानी जाहीर केले आहे असे गीते यानी सांगितले, शेकडो एकर जमीन खरेदी, बोगस कंपन्या, मनी लेडींग, सिंचन घोटाळयामुळे झालेल्या 
शेतकऱ्यांचे आत्महत्या, माजी मुख्यमंत्री बँ. अंतुलेंच्या पाठीत  खंजीर खुपसणारा विश्वास घातकी असावा का?  या सर्वांचा उल्लेख करून गीते यानी उपस्थित श्रोत्याना व मतदाराना आपणाला वरील पापे करणारा खासदार हवाय का? असे विचारून त्यांचे जाहीर नको असे उत्तर घेत म्हसळा करानी तटकरे याना नापास केले. रायगडचा खासदार कसा असावा असे जाहीर विचारले असता म्हसळा करानी निष्कलंक व अनंत गीतें प्रमाणे आसावा असे जोराने सांगितले.
    आता माझ्या लढ्यात मागील मंडळी सोबत नवीन फौज आहे त्यात अलिबाग येथील महेंद्र दळवी, विजुभाऊ कवळे, दिपक रानवडे, राजा केणी, महेश मोहीते, रोह्याचे समीर शेडगे, उद्देश वाडकर, पालीचे प्रकाश देसाई, रवी देशमुख, मिलींद देशमुख,माणगावचे राजू साबळे, श्रीवर्धनचे शाम भोकरे, सुरेश करण, म्हसळ्याचे महादेव पाटील, मंडणगडचे सुलतान मुकादम हे तटकरेंचे समर्थक आता दुपटीने कडवे व कट्टर शिवसैनीक आहेत या सर्वांच्या ताकदीने माझा विजय निश्चित आसल्याचे गीते यानी सांगीतले. मी आज खासदार आहे केंद्रात मंत्री मंत्री आहे , येत्या निवडणुकीत निवडून येऊन मी पुन्हा खासदार व मंत्रीही होणार आसल्याचे गीते यानी आत्मविश्वासानी सांगितले. यावेळी कृष्णा कोबनाक, नाविद अंतुले, सुलतान मुकादम, उस्मान रोहेकर, संजय कोन कर यानी तटकरे यांच्या भ्रष्टाचाराचा फर्दापाश केला.

Post a Comment

أحدث أقدم

नक्की वाचा