म्हसळा श्रीवर्धन तालुक्यातून सुनील तटकरेंना मताधिक्य देण्याचा शेकाप कार्यकर्त्यांचा निर्धार


म्हसळा वार्ताहर
म्हसळा श्रीवर्धन तालुक्यातून राष्ट्रवादी काँग्रेस ,काँग्रेस, शेकाप आघाडीचे उमेदवार सुनील तटकरे यांना मताधिक्य देण्याचा निर्धार  शेकाप कार्यकर्त्यांनी केला. म्हसळा येथील पाच गाव आगरी समाज हॉल येथे शेकाप जिल्हा चिटणीस आस्वाद पाटील यांच्या अध्यक्षतेखाली म्हसळा व श्रीवर्धन तालुका शेकाप कार्यकर्त्यांची सभा संपन्न झाली याप्रसंगी कृषी सभापती पिंट्याशेठ पाटील,जेष्ठ नेते परशुराम मांदाडकर,श्रीपत ढोकटे,म्हसळा तालुका चिटणीस संतोष पाटील, श्रीवर्धन तालुका चिटणीस वसंत यादव,तुकाराम महाडिक, गौरीताई पयेर,विनायक गिजे,निलेश मांदाडकर यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. दोन्ही तालुक्यात शेकापची पक्षाची ताकद निर्यायक आहे पुरोगामी विचार टिकवण्यासाठी व जिल्ह्याचा विकास करण्यसाठी तटकरे साहेबांना लोकसभेला पाठवण्याचा काम शेकाप कार्यकर्ते करतील असा विश्वास आस्वाद पाटील यांनी व्यक्त केले.

Post a Comment

أحدث أقدم

नक्की वाचा