श्रीवर्धनमध्ये घनकचरा प्रकल्पाचा उडाला बोजवारा : लाखो रूपयांचा झाला कचरा ; नागरिकांच्या आरोग्याला धोका


श्रीवर्धन प्रतिनिधी
श्रीवर्धन तालुक्यामध्ये मोठा गाजावाजा करीत घनकचरा प्रकल्पाचे उद्घाटन तत्कालीन मंत्री ना . सुनील तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले होते . परंतु नव्याचे नवदिवस उलटले आणि पुन्हा येरे माझ्या मागल्या हाच प्रकार दिसून येत आहे . उद्घाटन केल्यानंतर काही दिवस घनकचरा प्रकल्पासाठी कचरा उचलण्यात आला . परंतु त्यानंतर कच - याचे ढिग ठिकठिकाणी दिसून येत होते . गाय गोठण या ठिकाणी साचलेला ओला आणि सुका कच - यामूळे परिसरामध्ये दुर्गंधी पसरलेली असून त्या ठिकाणी नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे . त्याकडे श्रीवर्धन नगरपालिकेच अक्षम्य दुर्लक्ष होत आसलेचे दिसून येत आहे . घनकचरा प्रकल्पाच्या गायगोठण या ठिकाणी श्रीवर्धन शहरातील कचरा उचलण्याचा ठेका संबंधीत एका ठेकेदाराला श्रीवर्धन नगरपरिषदेने ठेका दिला होता . परंतु त्याच्या मनमानी कारभारामुळे कच - याचे ढिग साचलेले दिसून येत होते . रोजच्या रोज परिसरातील कचरा उचलून तो कचरा घनकचरा प्रकल्पामध्ये नेवून त्यावर घनकचरा प्रकल्प करणे क्रमप्राप्त आहे . मात्र रोज प्रक्रिया न केल्यामुळे त्या ठिकाणी मोठमोठे पर्वतासारखे ढिग पहावयास मिळत आहेत . त्यामुळे गायगोठण या परिसरामध्ये दुर्गंधी पसरली असून नागरिकांच्या आरोग्यावर त्याचा परिणाम होऊन त्या ठिकाणचे नागरिक त्रस्त झालेले दिसत आहे . 

नगरपरिषदेच्या उदासीन कारभारामुळे घनकचरा प्रकल्पाचे ढिग साचले आहे . त्यावर प्रक्रिया केली जात नाहि . श्रीवर्धन नगरपालिका संबंधित ठेकेदाराला पाठीशी घालीत असून त्याला अभय दिले जात आहे . असे श्रीवर्धन नगरीतील नागरिकांकडून बोलले जात आहे . या घनकचरा प्रकल्पाचा दोनदा बोजवारा उडाला असून तिस - यांदा तरी हा प्रकल्प टिकाव धरील का ? अशी शंका नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे . घनकचरा व्यवस्थापन हा प्रकल्प नसून त्याठिकाणी डम्पिंग ग्राऊंड तयार झालेला आहे . तेथे कच - याचे मोठमोठे डोगंर तयार झालेले आहे . या ठिकाणी कुठलाही खतनिर्मिती होत नाही . त्या ठिकाणचा वातावरण पूर्णपणे दूषित झालेले आहे . त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे . याकडे कोणही लक्ष देत नाही . तेथील पिण्याच्या पाणीसुध्दा बेचव लागत आहे , अशी तक्रार श्रीवर्धन गायगोठण येथील स्थानिक देवेंद्र भुसाणे यांनी केली आहे . 

 वेळोवेळी श्रीवर्धन नगरपरिषेदच्या सभेमध्ये घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प होत असलेल्या नियोजनाला विरोध करून त्याचप्रमाण लेखी तक्रार देवूनसुध्दा श्रीवर्धन नगरपाकिला ह्या कडे लक्ष देतांना दिसत नाही . श्रीवर्धनमधील घनकच - याच्या ठिकाणी मोठमोठे कच - याचे ढीग पडलेले आहेत . त्यामुळे परिसरामध्ये दुर्गधी पसरलेली असते . तेथील नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे .
-प्रितम श्रीवर्धनकर , श्रीवर्धन नगरपरिषद विरोधी पक्षनेते

ठेकेदारांवर श्रीवर्धन नगरपरिषदेमार्फत कारवाई करणेबाबत पुढील नियोजन मासिक सभेमध्ये उचित कारवाई करण्याबाबत मा . अध्यक्ष यांच्याकडे वस्तूस्थितीदर्शन प्रस्ताव सादर करण्यात येईल . 
-किरणकुमार मोरे , मुख्याधिकारी

घनकचरा प्रकल्पाच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची खतनिर्मिती होत नाही . उलट या ठिकाणी कच - याचे मोठमोठे डोंगर तयार झालेले दिसत आहे . संपुर्ण परिसरामध्ये दुर्गंधी पसरली आहे . नागरिकांचे आरोग्य धेक्यात आल्याने वेळीच उपाययोजना करणे गरजेचे आहे .
-कृष्णा कोबनाक , भाजप नेते 

Post a Comment

أحدث أقدم

नक्की वाचा