श्रीवर्धन तालुक्यात सर्वत्र डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती जल्लोषात साजरी



श्रीवर्धन शहरात पारंपरिक वेशभूषा करून भव्य मिरवणुक महापुरुषांची रूपे तरुणाईने साकारली

डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रत्येक भारतीयांच्या हृदयात ...डॉ संजय खैरे

श्रीवर्धन प्रतिनिधी संतोष सापते

देशातील  विषमता नष्ट करून सामाजिक समता व स्वातंत्र्य निर्माण करण्याचे काम डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी केले. त्यांच्या अथक परिश्रम व प्रयत्नां मुळे देशात स्थैर्य व प्रगती एकत्र साधली जात आहे. माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार संविधानाच्या माध्यमातून आंबेडकरांच्या मुळे आपणांस प्राप्त झाला आहे असे प्रतिपादन संजय खैरे यांनी श्रीवर्धन बौद्धहितकारणी सभेच्या जयंती उत्सव निमित्त कार्यक्रमात केले .श्रीवर्धन बौद्ध हितकारणी सभागृहात आयोजित जयंती उत्सवात खैरे यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरित्रावर मार्मिक व उद्बोधक पणे उपस्थितां सोबत संवाद साधला. आंबेडकर हे हुशार विदयार्थी ,थोर विचारवंत व जनमानसावर प्रचंड प्रभाव असलेले लोकनेते होते .आपल्या समाजाची दयनीय व वाईट अवस्था याचे विदारक चित्र त्यांच्या डोळ्यासमोर सदैव असत .परिस्थिती व संघर्ष यांच्या शी सांगड घालत बाबासाहेबानी अनेक पराक्रम आपल्या विनयशील व महत्वकांक्षी वृत्तीमुळे घडवून आणले. त्याग ,संघर्ष ,अपमान ,जिद्द व स्वप्नवादी विचार या सर्वांचे समर्पक उदाहरण म्हणजे बाबासाहेब आंबेडकर आहेत असे खैरे यांनी सांगितले .आपण फक्त बाबासाहेबांच्या नावांचा जयघोष करून चालणार नाही तर त्याचे चरित्र सत्यात उतरवले पाहिजे .विनयशीलता ,चारित्र्य       ,  उदारता , कष्ट व स्वप्न वाद याचा आदर्श आपण बाबासाहेब आंबेडकर यांच्या कडून घेणे काळाची गरज आहे .आपली मुलं चांगल्या शाळेत शिकली पाहिजेत .ज्ञान व संयम व्यक्तिमत्त्वघडवण्यात महत्त्वाची भूमिका बजावत असतात .आपल्या प्रत्येक विदयार्थी वर्गाने आपले ध्येय व स्वप्न निश्चित केले पाहिजेत व त्या नुसार आपले वर्तन सुधारने गरजेचे आहे .असे संजय खैरे यांनी सांगितले. सदरच्या कार्यक्रमासाठी बौद्ध हितकारणी श्रीवर्धन व मुंबई मंडळाचे
संजय मोरे ,रमेश खैरे ,हरीचंद्र जाधव ,दीपक शिर्के ,दिनेश तांबे ,प्रदीप तांबे व असंख्य बौद्ध समाज बांधव मोठया संख्येने उपस्थित होते.
आज बौद्ध हितकारणी सभागृह ,नगरपरिषद ,शिवाजी चौक अशी भव्य मिरवणूक काढण्यात आली. सदरच्या मिरवणुकीत विविध महापुरुषांचे प्रतीकात्मक रूपे तरुणांनी साकारले .या मध्ये  छत्रपती शिवाजी महाराज ,डॉ बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतीराव  फुले ,गौतम बुद्ध, सावित्रीबाई फुले,रमाबाई आंबेडकर यांची रूपे साकारण्यात आली .

Post a Comment

أحدث أقدم

नक्की वाचा