कोथळीगडावर सापडलेल्या ब्रिटीश बनावटीच्या तोफेला सह्याद्री प्रतिष्ठानच्या मावळ्यांनी दिली नवसंजीवनी ...


 संजय खांबेटे : म्हसळा 
 सह्याद्री प्रतिष्ठान हि संस्था गेल्या १० वर्षापासून गडकिल्ले संवर्धन यासाठी महाराष्ट्रभर कार्य करत असून आतापर्यंत संस्थेने महाराष्ट्रातील विविध किल्यांवर ७०० हून अधिक स्वच्छता मोहिमा राबवल्या आहेत. या मोहिमा केंद्र पुरातत्व विभाग व राज्य पुरातत्व विभागाच्या संरक्षित असलेल्या किल्यांवर राबवल्या त्यांच्या मार्गदर्शनानाने राबविल्या जात आहेत. संस्थेचे संस्थापक श्री श्रमिक गोजमगुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली दुर्ग संवर्धनाची चळवळ महाराष्ट्राबर सुरु आहे हजारो दुर्गप्रेमी संस्थे मार्फत विविध गडकिल्ल्यांवर दुर्ग संवर्धन मोहिमा राबवत आहेत. 
     कर्जत पासून अवघ्या ४० किमी अंतरावर असलेल्या कोथळीगड उर्फ पेठ किल्ला या गडावर आजवरच्या इतिहास अभ्यासक संशोधक यांनी लिखाण केलेल्या गडाच्या इतिहासात दोन तोफांची नोंद आहे त्यातील एक तोफ गडाच्या माचीवरील पेठ या गावात लहान उखळी तोफ आहे तर गडावर दुसऱ्या प्रवेशद्वारातून प्रवेश केल्यावर दुसरी ६.५ फुट लांबीची तोफ होती, अशी नोंद मिळते. बऱ्याच इतिहास अभ्यासकांनी गडावर तिसरी तोफ नाही असे सांगितले. तसेच गडावर असलेल्या ६.५ लांबीच्या तोफेला  फेब्रुवारी २०१९ रोजी सह्याद्री प्रतिष्ठानने या तोफेला लोकवर्गणीतून तोफगाडा बसविला होता. गडाच्या इतिहासाच्या आधारे या गडाचा मराठी इंग्रजी कागदपत्रातून तसेच मुघली कागद पत्रातून एक बलाढ्य संरक्षण ठाण होत आणि मराठ्यांचे या गडावर शस्त्रागार होते. संभाजी महाराजांच्या काळात या गडाला विशेष महत्व आले होते.

     या गडावर कित्तेक वर्ष उलटून गेली पण गेल्या आठवड्यात सह्याद्री प्रतिष्ठान कर्जत विभाग अध्यक्ष सुधीर साळोखे आणि सदस्य गणेश बोराडे यांनी किल्ल्याची नियमित पाहणी साठी गेले असता स्थानिक ग्रामस्थांनी त्यानी त्यांच्या पूर्वजांनी गडावर आणखी एक तोफ होती असे सांगितले पण ती कुठे आहे हे माहित नव्हते त्याचा शोध संस्थेच्या सदस्यांनि घेतला असता. तेव्हा गडाच्या दुसऱ्या प्रवेशद्वाराच्या १०० फुट खाली एका भल्या मोठ्या दगडाखाली मातीत बुजलेली ४.५ फुट लांबीची तोफ सापडली. दि.०७.०४.२०१९ रोजी सह्याद्री प्रतिष्ठान कर्जत विभागाने मोहिमेची तयारी केली आणि संस्थेचे संस्थापक श्री श्रमिक गोजमगुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली मोहिमेचे नियोजन झाले. या तोफेला मातीतून  बाहेर काढून दोराच्य साह्याने १००  फुट वर असलेल्या प्रवेशद्वार पासून जवळ असलेल्या सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आले. जवळपास ५ तास संस्थेच्या ६० सदस्यांनी भर उन्हात श्रमदान करून या तोफेला नवी संजीवनी दिली आहे. आजवर कोथळी गडावर दोन तोफा होत्या परंतु गावकऱ्यांनी दिलेल्या माहितिनी शोध घेऊन तोफेचा शोध घेऊन इतिहासापासून लुप्त झालेल्या तोफेला उजाळा मिळाला त्याबद्दल श्रमिक गोजमगुंडे यांनी गावकऱ्यांचे आभार मानले. तसेच पुरातत्व विभागाने केलेल्या सहकार्य बद्दल हि आभार व्यक्त केले.
     या किल्याची दुर्ग अवशेषात नोंद व्हावी म्हणून पुरातत्व विभागाला पत्राद्वारे तोफेचे मोजमाप आणि माहिती दिली जाणार असून लवकर या हि तोफेला त्याचे पुर्नवैभाव प्राप्त होण्यासाठी सह्याद्री प्रतिष्ठान कर्जत विभागाकडून तोफगाडा बसविण्यात येईल.असे संस्थेचे दुर्ग संवर्धन विभाग अध्यक्ष गणेश रघुवीर , आमदार संजय केळकर, श्री दिलीप अण्णा सोनावणे यांनी सांगितले.

Post a Comment

أحدث أقدم

नक्की वाचा