प्रतिनिधी : म्हसळा
श्रीवर्धन मतदारसंघात सुनील तटकरे आमदार , मंत्री असताना त्यांनी केलेला आणि करत असलेला विकास त्याचबरोबर त्यांचा गावोगावी जनतेशी असलेला संपर्क आणि जनतेचे त्यांच्यावर असलेले प्रेम पहाता आगामी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत आघाडीचे उमेदवार सुनील तटकरे यांचा भरघोस मतांनी विजय होणार असा विश्वास म्हसळा मेंदड़ी पंचायत समिती गणातील गावबैठकीत आ . अनिकेत तटकरे यांनी व्यक्त केला . ३२ रायगड लोकसभेच्या आघाडीचे उमेदवार सुनील तटकरे यांच्या निवडणूक प्रचाराचा म्हसळा तालुक्यात झंजावात सुरू झाला आहे . पंचायत समिती गण व जिल्हा परिषदेच्या गट निहाय गाव बैठकीत प्रचार सभेला सुनील तटकरे यांना मतदारांचा प्रतिसाद मिळत आहे . दरम्यान याबाबतचे चित्र २३ मे रोजी मतमोजणी दिवशी दिसून येणार आहे . दरम्यान म्हसळ्यातील आयोजित गावबैठकीत आ . अनिकेत तटकरे यांनी संबोधीत करताना सुनील तटकरे यांनी आमदार , मंत्री म्हणून त्यांनी केलेले व करत असलेले काम , सातत्याने जनसंपर्क आणि आम जनतेकडे जोडलेली आपुलकी प्रेमाचे नाते संबंधामुळे जनता त्यांना आपल्या परिवारातील माणुस समजत आहे . या प्रेमामुळे आणि सुनील तटकरे यांना विकास पुरुष समजत त्यांच्यावरील विश्वास दृढ झाला आहे . यावेळी रायगड लोकसभेत सुनिल तटकरे भरघोस मताधिक्याने निवडून येतील असा ठाम विश्वास आ . अनिकेत तटकरे यांनी मेंदड़ी पंचायत समिती गणातील गणेश नगर , बनोटी , खरसई , मेंदडी , मेंदड़ी कोंड , वारळ, काळसुरी , तुरुंबाडी , रोहिणी , आडीठाकुर , गोंडघर येथे मोठया लोकवस्तीच्या गावांत निवडणूक प्रचार करताना व्यक्त केला . काँग्रेस , शेकाप आघाडीच्या कार्यकर्त्यांनी नियोजन आणि शिस्तबद्ध जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गण निहाय गावोगावी प्रचाराची बैठकांवर भर देत जनतेला अभिप्रेत असलेले काम आपण पंचायत समिती , जिल्हा परिषद , महाराष्ट्र शासनाचे माध्यमातून केले आहे , करत असल्याचे मत जनमानसात बिंबवित आता अधिक प्रमाणात विकास करण्यासाठी सुनील तटकरे यांना मतरुपी आशीर्वाद देण्यासाठी आघाडीचे कार्यकर्ते , पदाधिकारी मतदारांशी प्रत्यक्ष संपर्क साधून संवाद करीत आहेत . यावेळी आमदार अनिकेत तटकरे यांच्या समवेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश चिटणीस अलिशेट कौचाली , तालुका अध्यक्ष समीर बनकर , काँग्रेस तालुका अध्यक्ष डॉ . मुविज शेख , जेष्ठ नेते बाळासाहेब करडे , लक्ष्मण भायदे श्रीपतराव धोकटे महादेव पाटील , सभापती छाया म्हात्रे , पक्ष संघटक जमीर नजीर , उपसभापती संदीप चाचले , जिल्हा परिषदेच्या सदस्या धनश्री पाटील , जिल्हा परिषद सदस्य बबन में नवे माजी जि . प . सदस्या वैशाली सावंत , जेष्ठ नेते व्यंकटेश सावंत , महिला अध्यक्षा रेश्मा काणसे , तालुका उपाध्यक्ष दामोदर पांडव , युवक संघटक दिपक म्हात्रे , तुकाराम मेंदाडकर , गण अध्यक्ष अनिल बसवत , गण अध्यक्ष जहर काझी शेकाप नेते परशुराम मंदाडकर , मेंदड़ी विभागाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे संघटक लहुजी म्हात्रे , काँग्रेसचे रहिम ततुल्ला मुकादम , जलाल जहांगीर भालचंद्र म्हसकर आदी मोठया संख्येने उपस्थित होते . यावेळी अनिकेत तटकरे यांनी विद्यमान खासदार अनंत गीते यांच्या कामाचा समाचार घेताना त्यांनी काही विशेष काम न करता आपली तीस वर्षे वाया घालविली आहेत . केवळ तटकरे यांच्यावर टीका करत जनतेकडे मत मागत आहेत असेही ते म्हणाले .

إرسال تعليق