दिघी : प्रतिनिधी
श्रीवर्धन तालुक्यातील बोर्लीपंचतन व इतर पाच गावांना पाणीपुरवठा होणाऱ्या कार्ले धरणातील पाणी अज्ञात व्यक्तीने सोडून पाण्याची नासाडी केली आहे . या प्रकरणात गावामधील मतभेद असणाया व्यक्तींवर कारवाई करण्यात येईल असा सक्त इशारा दिघी सागरी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक यांनी तातडीच्या बैठकीत दिला आहे . दोन दिवसांपूर्वी कार्ले धरणातील पाणी सोडणा-या व बोर्ली पंचतन ग्रामपंचायत निवडणुकीनंतर एकमेकांना डिवचणाऱ्या व्यक्तींवर कारवाईच्या अनुषंगाने मंगळवारी दिघी सागरी पोलीस ठाण्यात तातडीची बैठक बोलावण्यात आली . यावेळी राजकीय नेते मंडळी व इतर ग्रामपंचायतीच्या सरपंच , उपसरपंच , सदस्य व प्रमुख ग्रामस्थ उपस्थित होते . प्रसंगी सर्वाना चांगलीच तंबी देत कार्ले धरणाच्या प्रकरणामध्ये कोणी असेल त्यास आम्ही शोधून काढूच शिवाय त्याच्यावर कारवाई करणार आहोत , ग्रामपंचायत निवडणुका संपल्या आहेत . त्यातून सर्वानी बाहेर येऊन पराभव स्वीकारून शांतता राखावी . एकमेकांना डिवचण्याचे प्रकार तत्काळ थांबवावे त्यातून कोणताही अनुचित प्रकार घडला तर दोन्ही गटांवर कारवाई करण्यात येईल , असा इशारा सहाय्यक पोलीस निरीक्षक धर्मराज सोनके यांनी दिला.

إرسال تعليق