म्हसळा : श्रीकांत बिरवाडकर
प्रथमच रायगड जिल्ह्यात नुकतेच शिवसेनेत प्रवेश केलेले माजी मुख्यमंत्री बॅ.ए.आर अंतुले यांचे पुत्र नाविद अंतुले यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना भाजप युतीचे उमेदवार अनंत गीते यांच्या प्रचारार्थ शिवसेनेचा मुस्लिम कार्यकर्त्यांचा मेळावा दि. 14 एप्रिल रोजी आंबेत येथे सकाळी अकरा वाजता होणार आहे. गेल्या काही वर्षांत विधानसभा असो की, लोकसभा निवडणुका असो, शिवसेनेकडे मुस्लिम समाजाची मते फारशी वळली नाही आणि ही मते निर्णायक असतात. शिवसेना मुस्लिमविरोधी असल्याची प्रतिमा राष्ट्रवादी काँग्रेस आणि इतर पक्षांकडून आजपर्यंत करण्यात आली. पण आता परिस्थिती बदलली असून बहुसंख्य मुस्लिम समाज आज शिवसेनेच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचे सध्याचे चित्र आहे. बॅरिस्टर ए.आर.अंतुले यांचे सुपुत्र नाविद अंतुले यांनी काही दिवसापूर्वी पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्रीवर शिवसेनेत प्रवेश करून "हातावर' शिवबंधन" बांधले आहे. आणी त्यानंतर त्यांनी संपूर्ण रायगड जिल्हा पिंजून काढायला सुरवात केली. सर्वत्र त्यांना चांगला प्रतिसाद मिळताना दिसत असून मुस्लिम समाजाचे अनेक कार्यकर्ते आज नाविद अंतुले यांना पाठिंबा देऊन शिवसेनेत प्रवेश करीत आहेत. त्याची प्रचिती मोर्बा येथे झाली. ज्या ठिकाणी शिवसेनेचे काहीच वर्चस्व नसायचे त्या ठिकाणी मुस्लिम कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. नाविद अंतुले यांनी या मेळाव्याचे आयोजन केले असून या मेळाव्याला मुस्लिम समाजाच्या लोकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे, या उद्देशाने पक्षातील काही मुस्लिम समाजाच्या पदाधिकाऱ्यांना जबाबदारी दिली आहे. आंबेत येथे होणाऱ्या मेळाव्याला संपूर्ण रायगड जिल्ह्यातून मुस्लिमांनी मोठ्या संख्येने यावे असे आव्हाहन नाविद अंतुले यांनी केले आहे. तसेच शिवसेना कधीच देशभक्त मुस्लिमांच्या विरोधात नव्हती. मात्र शिवसेना मुस्लिमांच्या विरोधात असल्याचा आणी जातीयवादी असल्याचा विरोधक प्रचार करीत राहिले याचा फटका शिवसेनेला कायम बसला आहे. शिवसेनेची हि प्रतिमा बदलण्यासाठी संपूर्ण राज्यात असे मेळावे लावण्याचे गरज आहे असे मत पुढे बोलताना त्यांनी मांडले.
आंबेत येथे होणाऱ्या मेळाव्यामुळे राष्ट्रवादीची धडकी वाढली असून त्यांच्या गोटात चिंतेचे वातावरण असल्याचे चित्र आहे. हा मेळावा यशस्वी झाला तर नाविद अंतुले हिरो ठरणार असून राष्ट्रवादीला मात्र याचा मोठा फटका बसण्याची चिन्ह आहेत.

إرسال تعليق