दिवेआगरमधील शौचालयाला ३ वर्षे कुलूपच ; उद्घाटनाच्या वादात पर्यटकांची गैरसोय



दांडगुरी : वार्ताहर
रायगड जिल्हा परिषदेच्या सार्वजनिक बांधकाम खात्याकडून बांधण्यात आलेले शौचालय व चेजिंग रूम गेली तीन वर्षे उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे . कामाविना ही इमारत पडून आहे. उद्घाटन कुणी करायचं याच्या वादात पर्यटकांची गैरसोय होत आहे . कोंकण ग्रामीण पर्यटन विकास कार्यक्रम अंतर्गत दिवेआगर समुद्रकिनारी महिला व पुरुषांसाठी चेंजिंग रूम बांधले गेले . हे काम २०१६ - १७ मध्ये केलेले आहे . साडे बारा लाख रुपये खर्चुन हे बांधकाम करण्यात आले . कर्जत तालुक्यातील श्री कृपा सहकारी मजूर संस्थेने हे बांधकाम केले. हे शौचालय जि . प. तत्कालीन अध्यक्ष सुरेश टोकरे यांच्या कारकिर्दीत बांधण्यात आले होते. त्यानंतर खासदार अनंत गीते चार वेळा दिवेआगर येथे येऊन गेले मात्र उद्घाटन केले नाही. सध्या या रूमच्या दरवाजांना गंज चढला आहे.

हे खासदारांचे काम : शाखाप्रमुख
या चेंजिंग रूमच्या उद्घाटनाचा कार्यक्रम एप्रिल २०१८ मध्ये घेण्यात आलेला मात्र त्यावेळी दिवेआगरचे शिवसेना शाखाप्रमुख प्रकाश भाटकर यांनी हे काम सांसद आदर्श ग्राम योजनेअंतर्गत केले असल्याचे सांगत उद्घाटनाला आक्षेप घेतला. मात्र प्रत्यक्षात जिल्हा परिषदचा फलक लागल्याचे दिसते . 

सदर बाथरूम व मुतारी हे काम जिल्हा परिषदेमार्फत करण्यात आले होते . टॉयलेटचे उद्घाटन जि . प . अध्यक्षा आदिती तटकरे यांच्या हस्ते करण्यात येणार होते . तेव्हा विरोध करण्यात आला . हे टॉयलेट आदर्श गाव योजनेअंतर्गत करण्यात आले असेल तर पूर्ण झालेल्या रूमच्या उद्घाटनला तीन वर्षे का ?
- उदय बापट सरपंच - दिवेआगर 

Post a Comment

أحدث أقدم

नक्की वाचा