शिवसेना माजी विभाग प्रमुख तथा माजी सरपंच मनोज नाक्ती यांचा शिवसेनेला जय महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात केला प्रवेश.
म्हसळा : श्रीकांत बिरवाडकर
लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शेकाप मित्र पक्षाचे उमेदवार सुनिल तटकरे यांना म्हसळा तालुक्यात मतदारांचा वाढता पाठींबा मिळताना दिसत आहे. तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माध्यमातून गाव वाडीवर विकास काम होत असल्याने तालुक्यातील शिवसैनिक व कार्यकर्ते निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीच्या विकास रथात दाखल होत आहेत. तोंडसुरे गावातील रखडलेला विकास करून घेण्यासाठी शिवसेना नेते तथा माजी सभापती महादेव पाटील यांचे खंदे समर्थक माजी सरपंच, शिवसेना मेंदडी माजी विभाग प्रमुख मनोज नाक्ती यांनी खासदार अनंत गीते यांनी गेल्या 10 वर्षात मागणी करूनही गावात एकही विकासकाम न केल्याने मनोज नाक्ती यांनी त्यांच्या समर्थकांसह गीते यांच्या कार्यपध्दतीला कंटाळुन आमदार अनिकेत तटकरे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. आघाडीचे लोकसभा उमेदवार सुनिल तटकरे यांचे निवडणुक प्रचारासाठी तोंडसुरे गावात गावबैठक घेण्यात आली होती. यावेळी मनोज नाक्ती यांनी प्रास्तविक करताना गावात जो विकास झाला आहे तो केवळ राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून झाला आहे. शिवसेना फक्त विकास करू असे आश्वासन देत ग्रामस्थांची फसवणूक करीत असल्याने गावाचा विकास करण्यासाठी आपण 40 वर्षांनी शिवसेनेचा त्याग केला असल्याचे सांगितले. या वेळी गाव अध्यक्ष गोपाळ भायदे, माजी सरपंच सुरेश महाडिक,ग्राम पंचायत माजी सदस्य उमेश नाक्ती, माजी पोलीस पाटील मोहन नाक्ती, जेष्ठ मान्यवर स.भी.पवार, हरि नाक्ती,विठोबा पवार, मोरेश्वर जंगम यांनी आम्ही काँग्रेस शेकाप आघाडीचे लोकप्रिय उमेदवार सुनिल तटकरे यांना पाठींबा देत भरघोस मतांनी निवडुन आणू असे आश्वाशीत केले. यावेळी गाव बैठकीत आमदार अनिकेत तटकरे यांचे समावेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश चिटणीस अलीशेट कौचाली, काँग्रेसचे माजी तालुका अध्यक्ष महादेव पाटील, शेकापचे जेष्ठ नेते श्रीपतराव धोकटे, तालुका अध्यक्ष समीर बनकर, जिल्हा परिषद सदस्य बबन मनवे, सभापती छाया म्हात्रे, उपसभापती संदीप चाचले, मधुकर गायकर, शहर अध्यक्ष रियाज घराडे, गण अध्यक्ष सतिश शिगवण, प्रकाश गाणेकर, लक्ष्मण कांबळे, किरण पालांडे आदी मान्यवर उपस्थित होते. आमदार अनिकेत तटकरे यांनी यावेळी तोंडसुरे गावातील झालेला विकास राष्ट्रवादी काँग्रेसनेच केला आहे येथे स्थानिक स्वराज्य संस्था आमचे ताबेत नसली तरी गावाचं विकास राष्ट्रवादीनेच केला आहे आता उरलेला, रखडलेला आणि अपेक्षित विकास टप्याटप्याने आम्ही पंचायत समिती, जिल्हा परिषद, आमदार निधीमधून करू असे सांगितले.

إرسال تعليق