Kharsai : न्यू इंग्लिश स्कूल खरसईमध्ये इ. 8 वीच्या नवागतांचे उत्साहात स्वागत


खरसई (ता. म्हसळा) : विनय शिक्षण संस्था संचलित न्यू इंग्लिश स्कूल, खरसई येथे इयत्ता 8 वीच्या नवागत विद्यार्थ्यांचे उत्साहपूर्ण वातावरणात स्वागत करण्यात आले.

या प्रसंगी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष परशुराम मांदाडकर, आगरी समाज अध्यक्ष महादेव नाक्ती, सचिव रामचंद्र मांदारे, तुकाराम मांदाडकर, कानू शितकर, निलेश मांदाडकर, हेमंत पयेर यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेल्या मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. शासनाच्या नियमानुसार नवागतांना मोफत पाठ्यपुस्तके वितरित करण्यात आली.
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक नितीन पाटील, सर्व शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विशेष म्हणजे, सामाजिक बांधिलकी जपत शैलेशकुमार पटेल यांनी शाळेला दोन पंखे भेट देत सहकार्याचा हात पुढे केला. त्यांच्या या उपक्रमाचे उपस्थितांनी मनःपूर्वक कौतुक केले.

या स्वागत समारंभाने विद्यार्थ्यांमध्ये नवा उत्साह संचारला असून शैक्षणिक वर्षाची सुरुवात आनंददायी वातावरणात झाली.

Post a Comment

أحدث أقدم

नक्की वाचा