म्हसळा (प्रतिनिधी) – ५ जून रोजी जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून पांडुरंग शास्त्री आठवले शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, म्हसळा येथे पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा कार्यक्रम उत्साहात पार पडला.
या उपक्रमात सामाजिक वनीकरण म्हसळा विभागाचे वनक्षेत्रपाल पि. एम. पाटील आणि आर.एफ.ओ. संजय पांढरकामे यांच्या मार्गदर्शनाखाली व अथक परिश्रमांतून संस्थेच्या परिसरात वीस प्रकारांची मिश्र वृक्षप्रजाती लागवड करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे प्रमुख पी. एस. कांबळे सर होते. यावेळी श्री तेटगुरे (वनरक्षक) यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले, तर श्री सूर्यतळ यांनी वन्यजीवन व पर्यावरणविषयी दोन स्फूर्तीदायक गीतांच्या सादरीकरणाने उपस्थितांमध्ये पर्यावरणाबद्दल जागरूकता निर्माण केली.
भाऊसाहेब बी. डी. कांबळे यांनी कार्यक्रमाच्या प्रचारासाठी प्रेरणादायी मनोगत व्यक्त केले. याशिवाय देशमुख सर, कुलकर्णी सर, सुतार सर आणि नाकती सर यांनीही उपक्रमात मोलाचे सहकार्य केले.
कार्यक्रमात वनरक्षक देवरे, चेवळे, लालछोटे, घुबे, खरात, विशाल जाधव, चव्हाण, ढाकणे, पि. जाधव, मोहळकर, राठोड, बिन्नर, येल राठोड यांची उपस्थिती होती. विद्यार्थी व विद्यार्थिनींनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवून पर्यावरणप्रेम दाखवले. या उपक्रमास मधुकर रिकामे (जांभूळ) यांचे विशेष सहकार्य लाभले.
पांडुरंग शास्त्री आठवले आयटीआय मार्फत झालेला हा पर्यावरण दिन साजरा ही भविष्यातील हरित उपक्रमांसाठी आदर्श ठरणारा पाऊल ठरेल.
إرسال تعليق