मानव एकता दिवस - निष्काम सेवेचा अनुपम संकल्प
निरंकारी भक्तांकडून देशभरात ३० हजार युनिट रक्तदान
भरडखोल येथेही ७७ युनिट रक्तदात्यांनी केले रक्तदान
महाड : रघुनाथ भागवत
प्रतिवर्षाप्रमाणे संत निरंकारी मिशनमार्फत २४ एप्रिल रोजी बाबा गुरबचनसिंहजी यांच्या पावन स्मृतिप्रित्यर्थ प्रेम व बंधुभावना जागविणारा मानव एकता दिवस श्रद्धा व भक्तीभावपूर्ण वातावरणात आयोजित करण्यात आला. हा दिवस केवळ पुण्यस्मरण करण्याचा प्रसंग नसून मानवता, सौहार्द आणि एकत्वाच्या भावनांचा एक आत्मिक संगम आहे.
मानव एकता दिवसाच्या या प्रसंगी मिशनकडून देशभर रक्तदानाच्या एका प्रेरक श्रृंखलेचा शुभारंभ होतो जी नि:स्वार्थ सेवाभावनेच्या सामूहिक जागृतीचे स्वरूप बनून संपूर्ण वर्षभर समाजामध्ये प्रवाहित होत राहते. त्याचबरोबर सत्संग कार्यक्रमांच्या माध्यमातून प्रेम, शांती आणि समरसतेचा प्रकाशदेखील जनसामान्यांपर्यत पोहचविला जातो. हा दिवस या गोष्टीचा परिचायक आहे, की सेवा केवळ एक कार्य नसून निष्काम, समर्पण व आत्मिक भावनेचे द्योतक आहे.
यावर्षी सुद्धा संत निरंकारी चैरिटेबल फाउंडेशन मार्फत पूर्ण भारतवर्षात सुमारे ५०० हून अधिक शाखांमध्ये भव्य रक्तदान शिबिरांची अखंड श्रृंखला आयोजित करण्यात आली. संत निरंकारी हेल्थ सिटीच्या मेडिकल डायरेक्टर गीतिका दुग्गल यांनी माहिती देताना सांगितले, की आज संपूर्ण भारतभर आयोजित रक्तदान श्रृंखलेअंतर्गत सुमारे ३० हजार यूनिट रक्त संकलित करण्यात आले ज्यामध्ये केवळ दिल्ली येथील शिबिरात जवळपास १ हजार युनिट रक्त जमा करण्यात आले. संत निरंकारी सत्संग भवन भरडखोल येथेही आयोजित केलेल्या रक्तदान शिबीरात ७७ भाविकांनी स्वेच्छेने रक्तदान केले.
हे महाअभियान केवळ रक्तदान नसून सतगुरु माता सुदीक्षाजी महाराज यांचा करुणा, सेवा आणि एकत्वाचा संदेश जीवनात उतरविण्याचे सजीव माध्यम आहे जे आम्हाला शिकवते, की मानवता हाच सर्वोच्च धर्म होय. याच प्रेरणेने युक्त संत निरंकारी मिशन, सेवा आणि समर्पणाच्या पथावर निरंतर मानवतेचा मार्ग प्रशस्त करत आहे.
युगप्रवर्तक बाबा गुरबचनसिंहजी यांनी सत्यबोधाच्या माध्यमातून समाजाला अंधश्रद्धा व अनिष्ठ प्रथांपासून मुक्त करुन नशामुक्ती, साधे विवाह आणि युवावर्गाला सकारात्मक विचारांशी जोडणे यांसारख्या लोककल्याणकारी अभियांनाची प्रेरक सुरवात केली. त्यांचे पावन मार्गदर्शन पुढे चालवत बाबा हरदेवसिंहजी यांनी “रक्त नाड्यांमध्ये वाहावे, नाल्यांमध्ये नको” हा अमर संदेश देऊन रक्तदानाला मिशनच्या आध्यात्मिक सेवेचे अभिन्न अंग बनवले. हा संदेश आजदेखील प्रत्येक निरंकारी भक्ताच्या हृदयामध्ये सेवा आणि समर्पणाची प्रेरक ज्योत बनून तेवत आहे.
हा दिवस चाचा प्रतापसिंहजी यांच्यासह त्या सर्व समर्पित बलिदानी संतांच्या पुण्य स्मृतिचे प्रतीक आहे, ज्यांनी मानव एकता, निःस्वार्थ सेवा आणि आध्यात्मिक जागृतीच्या मार्गावर चालत असताना आपले संपूर्ण जीवन समर्पित केले. मानव एकता दिवस त्याच संतांचा दृढविश्वास व दृढसंकल्पाची प्रेरणा जीवंत करतो.
मानव एकता दिवसाच्या निमित्ताने खरसई झोन मध्ये ८ ठिकाणी ज्यामध्ये खरसई, सावरोली, पेण, निवी, मानी, महाड, माणगाव आणि हरकोलकोंड येथे मानव एकता दिवस सत्संग समारोहाचे आयोजन करण्यात आले होते. ज्याद्वारे बाबा गुरबचनसिंहजी व अन्य बलिदानी संतांच्या दिव्य जीवनातून प्रेरणा प्राप्त करण्यात आली.
إرسال تعليق