संत निरंकारी मिशनकडून मानव एकता दिवसाचे आयोजन

रायगडसह देश-विदेशात ५०० ठिकाणी रक्तदान अभियान 
खरसई  : प्रसाद पारावे

आध्यात्मिकताच मानव एकता मजबूत करु शकते तसेच मानवाला मानवाच्या जवळ आणून परस्पर प्रेम व सौहार्दाचे वातावरण निर्माण करु शकते. हेच मंतव्य समोर ठेऊन सतगुरु माता सुदीक्षाजी महाराज व निरंकारी राजपिताजी यांच्या आशीर्वादाने प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी २४ एप्रिल, २०२५ रोजी दिल्लीतील ग्राउंड नं.८, निरंकारी चौक, बुराडी रोड येथे ‘मानव एकता दिवस’ समारोहाचे आयोजन करण्यात आले आहे. 

या व्यतिरिक्त देशभरातील मिशनच्या समस्त शाखांमधील भाविक भक्तगणदेखील एकत्रित येऊन बाबा गुरबचनसिंहजी आणि मिशनचे अनन्य भक्त चाचा प्रतापसिंहजी यांना आपली श्रद्धा सुमने अर्पित करतील व त्यांच्या महान जीवनातून प्रेरणा प्राप्त करतील.

संत निरंकारी मंडळाचे सचिव व समाज कल्याण विभागाचे प्रभारी आदरणीय श्री जोगिंदर सुखीजा यांनी माहिती देताना सांगितले, की सतगुरुंच्या असीम कृपेने यावर्षी देखील जगभरातील सुमारे ५०० पेक्षा अधिक ठिकाणी संत निरंकारी मिशनची सामाजिक शाखा संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या विद्यमाने रक्तदान शिबिरांच्या अविरत श्रृंखलेचे व्यापक आयोजन केले जाईल ज्यामध्ये जवळपास ५० हजार पेक्षा अधिक रक्तदाते मानवतेच्या भल्यासाठी रक्तदान करुन नि:स्वार्थ सेवेचे उदाहरण प्रस्तुत करतील.

दिल्लीच्या बुराडी स्थित ग्राउंड नंबर ८ वर सकाळी ८ ते दुपारी १२ या वेळात आयोजित केल्या जाणाऱ्या रक्तदान शिबिरामध्ये रक्त संकलन करण्यासाठी विविध हॉस्पिटलच्या प्रशिक्षित डॉक्टर व वैद्यकीय तंत्रज्ञांच्या टीम सहभागी होतील ज्यामध्ये इंडियन रेड क्रॉसची टीमदेखील अंतर्भूत असेल. या शिवाय देशभरातील अन्य राज्यांमध्ये आयोजित रक्तदान शिबिरांमध्ये स्थानिक हॉस्पिटलच्या प्रशिक्षित टीम उपस्थित राहून रक्त संकलनाचे कार्य पार पाडतील. या व्यतिरिक्त स्थानिक स्तरावर सर्व ठिकाणी मानव एकता दिवसानिमित्त विशेष सत्संग समारोहांचे आयोजन केले जाईल.
 
स्थानिक स्तरावर खरसई (रायगड) ४०-अ झोन स्तरीय भरडखोल येथे दिनांक २४ एप्रिल रोजी सकाळी १० ते दुपारी ०१ या वेळात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून ज्यामध्ये संपूर्ण झोन मधून रक्तदाते योगदान देतील. मानव एकता दिवसाच्या निमित्ताने खरसई झोन मध्ये ७ ठिकाणी ज्यामध्ये खरसई, सावरोली, पेण, निवी, मानी, महाड आणि माणगाव येथे मानव एकता दिवस सत्संग समारोहाचे आयोजन करण्यात आले आहे.
 
युगदृष्टा बाबा हरदेव सिंह जी यांनी सन् १९८६ पासून सुरु केलेली रक्तदान अभियानाची मोहिम आज मागील जवळपास ४ दशकांमध्ये आयोजित करण्यात आलेल्या ८ हजार ६४४ शिबिरांमध्ये मिशनमार्फत १४ लाख ५ हजार १७७ युनिट रक्त मानवमात्राच्या भल्यासाठी दिले गेले आहे आणि या सेवा निरंतर चालू आहेत.

Post a Comment

أحدث أقدم

नक्की वाचा