(म्हसळा प्रतिनिधी)
Covid-19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तालुका स्तरावरून गावपातळी पर्यंत शासनाने मोर्चे बांधणी केली आसल्याचे म्हसळा तालुक्यात चित्र आहे.
या पार्श्वभूमीवर म्हसळा तालुक्यात ग्रामस्तरावर covid-19 चा प्रादुर्भाव होऊ नये याकरिता खालील प्रमाणे सूचना संबंधीताना देण्यात आल्या आहेत.
१)परदेशातून प्रवास करुन आलेल्या नागरिकांची आरटी. पी.सी.आर (RTPCR) टेस्ट पूर्ण करण्यात आलेले आहे किंवा कसे याची खात्री करण्यात यावी.
२)आर टी पी सी आर (RTPCR) टेस्ट निगेटिव्ह आली तरीसुद्धा पुढील पंधरा दिवसाच्या कालावधीत सदर व्यक्तीला covid सदृश्य लक्षणे ताप,सर्दी,खोकला इत्यादी आहेत अगर कसे याची खात्री करणे.
३)तालुक्याच्या बाहेरुन आलेल्या इतर नागरीक / व्यक्ती यांचेवर आरोग्याच्या दृष्टीकोनातून लक्ष ठेवणे.
४)कोविड 19 सदृष्य लक्षणे निदर्शनास आल्यास तात्काळ सबंधित व्यक्ती यांना नजीकचे आरोग्य केंद्रांमध्ये जाऊन तपासणी करण्याबाबत सूचना द्याव्यात किंवा आरोग्य केंद्रात आपण संपर्क साधून सदर व्यक्तीबद्दल माहिती त्यांना देण्यात यावी. अशा सूचना
इन्सिडेंट कमांडर आपत्ती व्यवस्थापन समिती तथा तहसीलदार समीर घारे म्हसळा यानी पोलीस पाटील तलाठी , ग्रामसेवक याना केल्याआहेत.
إرسال تعليق