म्हसळयात ६ घरफोड्या : १ लक्ष ५६ हजार दोनशेचा ऐवज लंपास : म्हसळा पोलीसाना सापडेना धागा ना दोरा म्हसळा करांच्या चिंतेत वाढ
संजय खांबेटे : म्हसळा
म्हसळा शहरातील भरवस्तीतील रहदारीच्या भागातील एकाच रात्रीत तब्बल ६ घरे फोडून चोरट्यानी स्थानिक पोलीसांचा वाढविला ताप तर मध्यम वर्गीय शहर वासीयांच्या चिंतेत भर टाकली आहे. दिनांक २३-२४ डिसेंबरच्या रात्री१)सुनील उमरटकर (गुरुजी)२)रमेश गजानन पोतदार ३) विनायक शांताराम पोतदार ४)जमाल अजीम तळकर.५) नवीद घरटकर ६) मंगेश हेगीस्टे या सहा जणांपैकी तब्बल ५ घरांतून चोरट्यानी एकूण रुपये१ लक्ष५६ हजार दोनशेचा ऐवज लंपास केला.रमेश गजानन पोतदार या सर्वात शेवटच्या इसमाचे रोख रु ७० हजार आणि रु ५ हजार किमतीच्या हीऱ्याच्या कुड्या अशा रु.७५ हजार रक्कमेच्या ऐवजावर चोरट्यानी डल्ला मारल्याची माहीती तपासी अंमलदार चव्हाण यानी दिली.
बहुतांश घरांतून चोरट्यानी एकाच पध्दतीने गुन्हा केला आहे.कुलुप किंवा कडी कटरने तोडून घरात प्रवेश केला,छोटया /मोठया हत्याराने घरांतील कपाटे उघडून आतील रोख रक्कम किंवा मौल्यवान वस्तू घेऊन पोबारा केला असा पोलीसांचा अंदाज आहे.सुनील उमरटकर (गुरुजी) यानी दिलेल्या फिर्यादी वरुन सदर ६ घरफोडयाचा एकत्रित गुन्हा रजी नं.८० /२०२१ भा.द.वि.सं. कलम४५४,४५७, ३८०प्रमाणे गुन्ह्याची म्हसळा पोलीसानी नोंद केली आहे.म्हसळा पोलीसानी सपोनी उध्दव सुर्वे यांच्या मार्गदर्श नाखाली तपासी अमलदार चव्हाण व त्यांच्या टीमने सुरवात केली आहे.सुखातीला गुन्ह्याचे गांभीर्य न कळल्याने श्वानपथक आणले नाही तरी जिल्ह्यांतील निष्णात ठसे तज्ञांचे माध्यमातून चोर कुठून आले व कोणीकडून पळून गेले हे पहाण्याचा, शहरांतील विविध महत्वाच्या मार्गावरील CCTV फूटेज तपासण्या सुरु केल्या असल्याचे समजते.जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाने म्हसळा पोलीस स्टेशनचे रजेवर असणा ऱ्या सर्व अनुभवी व जेष्ठ कर्मचाऱ्याना तात्काळ कामावर हजर होण्या बाबत समज दिल्याचे समजते.
"म्हसळा पोलीस स्टेशन सन १९७२ते १९७४ चे दरम्यान सुरु झाले, त्याला सुमारे ४६ते ४८ वर्ष झाली.त्यावेळी मंजूर झालेला स्टाफ मध्येही आज कमतरता आहे,पोलीस स्टेशन सुरु झाल्या नंतर म्हसळा शहरा लगतहून जळगाव -दिघी हा राष्ट्रीय मार्ग सुरु झाला,तालुक्यात इंडस्ट्री आली, पर्यटक वाढले,शहरांत आणि तालुक्यात एकही पेट्रोल पंप नव्हता ते आता तीन झाले, शहरात व तालुक्यांत व्यवसाय वाढले,मगकायदाआणिसुव्यवस्था राखण्यासाठी शासन पुरेसे अधिकारी -कर्मचारी का देत नाही, तर जिल्हा पोलीस अधिक्षक म्हसळा पोलीस स्टेशनसाठी अद्यापही कायमस्वरूपी पोलीस निरीक्षक का देत नाही"
महादेव पाटील, माजी सभापती , पं.स. म्हसळा.
إرسال تعليق