म्हसळा शहरात ताडगोळे दाखल ; आयुर्वेदीक औषधी गूण : ग्राहकां कडून मागणी वाढली.


संजय खांबेटे : म्हसळा 
म्हसळा शहरांत आज अचानक आलिबाग तालुक्यातील ताडगोळे दाखल झाल्याने फळेखाणारी मंडळी ताडगोळ्यांकडे बऱ्यापैकी अकर्षीत झाली,त्यांचा खपही वाढला.ताडगोळ्याना आर्युवेदात औषध म्हणून विशेष महत्व आसल्याने आज दर जास्त असूनही खप मोठया प्रमाणात होत आहे.म्हसळा शहरांत पूर्वी ताडगोळे काढून रेवदंडा परिसरांतून आलेल्या माळणी फेरी करून विकत असत.आज मात्र अलीबाग तालुक्यातील नवगावचे वरदान घरत हे वांग्या सरखा काळपट जांभळ्या रंगाचे कठिण आवरणा चे सालासकट असलेले ताजे ताडगोळे ग्राहकाना थेट कापून देत आसल्याने आणि आशा पद्धतीचे ताडगोळे म्हसळा बाजारात प्रथमच आल्याने त्यानी भावही छान खाल्ला.फळाच्या आवरणातुन बाहेर काढलेला ताडगोळा फारसा टिकत नाही. सालही काळी पडत जाते आणि गर आंबूस होत जातो. वरच्या फळाच्या आवरणात मात्र तो थोडाफ़ार टिकतो.नुकत्याच उतरवलेल्या फ़ळातुन काढलेल्या फळाची चव मात्र अप्रतिम लागते.

"ताड हा वृक्ष अ‍ॅरॅकेसी कुलातील असून त्याचे शास्त्रीय नाव बोरॅसस फ्लॅबेलिफर आहे. शिंदी, खजूर, माड (नारळ) या वनस्पतींही अ‍ॅरॅकेसी कुलातील आहेत"
बाळकृष्ण गोरनाक, वनस्पती विषयक आभ्यासक.
" ताडगोळे व त्यात असणारे चमचाभर पाणी हे, मूत्र विकार व शरीरातील उष्णतेची तीव्रता कमी करण्यासाठी फार उपयोगी आहे.ते खाण्याने दाह युक्त रोगाचे नियंत्रण होते" - दफेदार, झाडपाला आभ्यासक

Post a Comment

أحدث أقدم

नक्की वाचा