सार्वजनिक वाचनालय म्हसळा येथे श्रीमद्भगवतगीतेचे पूजन. | bhagavat Gita



म्हसळा प्रतिनिधी
सार्वजनिक वाचनालय म्हसळा येथे श्रीमद् भगवतगीता जयंती निमीत्त श्रीमद् भगवतगीता या ग्रंथाचेव शारदा देवीच्या प्रतिमेचे पूजन ग्रंथालयाचे सदस्य व माजी सभापती महादेव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी ग्रंथपाल उदय करडे,सायली चौगुले,खारगाव (बु) चे सरपंच अनंत नाक्ती,आप्पा गुरव,बंडूवारे, दिपाली दातार आदी मान्यवर उपस्थित होते.
श्रीमद्भगवद्गीता हा ग्रंथ अक्षर, अविनाशी आणि जीवनव्यवहारात अतिशय उपयुक्त असा जीवनग्रंथ आहे.कौरव-पांडव युद्धात अर्जुना ने स्वजनांना समोर युद्धासाठी पाहून शस्त्र खाली ठेवले होते. तो द्विधा मन:स्थितीत अडकलाहोता. त्यावेळी तो श्रीकृष्णाला शरण गेला आणि  युद्ध करावे की न करावे? यातील कोणता निर्णय धर्माच्या दृष्टीने योग्य होईल? या विषयी योग्य मार्गदर्शन करण्याची प्रार्थना केली होती.ग्रंथात शरणा गती,स्वधर्म,स्वधर्माचरण या बाबतची परिपूर्ण माहिती आहे. प्रत्येक वाचनालयाने,शाळा- कॉलेजने विद्यार्थ्यना श्रीमद्भगवद्गीता जयंती साजरी करण्यासोबत गीतेचे शुध्द वाचन व अर्थबोध सांगता येईल असे उपक्रम घ्यावेत असे यावेळी पाटील यानी सांगितले.जिल्ह्या तील पाली,महाडसह बहुतांश वाचनालयांतून आज श्रीमद्भग वद्गीता जयंती साजरी करण्यात आली.

Post a Comment

أحدث أقدم

नक्की वाचा