रा. जि. प. मराठी शाळा खरसई व ग्रामपंचायत खरसई येथे वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न


महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान ता.म्हसळा जि.रायगड तर्फे रायगड जिल्हा परिषद शाळा खरसई मराठी व ग्रामपंचायत खरसई येथे वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला. 
महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान अंतर्गत ग्रामपंचायत खरसई येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व ग्रामपंचायत येथे आज वृक्ष लागवड करण्यात आले.


शाळेच्या परिसरामध्ये औषधी व पेरू,जांभूळ, आवळा, बदाम फणस, काजूची  झाडे लावण्यात आलीआहेत.  शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष तथा सरपंच श्री.निलेश परशुराम मांदाडकर साहेब, उपसरपंच श्री.इम्रान आलिमिया अकलेकर साहेब ग्रामपंचायत सदस्या श्रीमती दिपाली तुकाराम कांबळे मँडम शाळेचे मुख्याध्यापक श्री.बालाजी राठोड सर, श्री.बालाजी मडावी सर, श्री.अशोक सानप सर, श्रीमती शारदा कोळसे मँडम श्री.संदीप शेंबाळे सर, ग्रामपंचायत कर्मचारी श्री.भास्कर नामदेव कांबळे व डाटाआँपरेटर श्री.गणेश मांदाडकर, श्रीमती .चांगुणा पांडुरंग म्हात्रे , श्री.अनंत गणपत म्हसकर , इतर ग्रामस्थ उपस्थित होते.


Post a Comment

أحدث أقدم

नक्की वाचा