८ वर्षे निवाऱ्यासाठी तरुणाची फरफट ; स्वराज्य प्रतिष्ठाण रायगड चे संस्थापक अध्यक्ष भास्कर भाई कारे आक्रमक



टीम म्हसळा लाईव्ह

"सरकारी काम आणि सहा महिने थांब" या उक्तीचा अनुभव आपल्या सगळ्यांनाच आला असेल. सहा महिने ठीक आहे ओ पण ७-८ वर्ष उलटून ही काम होत नसेल आणि शासन दरबारी न्याय मिळत नसेल तर सामान्य माणसाने कुणाकडे जावं... हाच प्रश्न श्रीवर्धन मधील युवक विचारतो आहे. श्रीवर्धन मधील कासारकोंड येथील रणजित रवींद्र घडशी या युवकाचा विडिओ सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात वायरल झाला आहे. श्रीवर्धन येथील या युवकाने साधारण ७ वर्षपूर्वी त्याच्या आईच्या नावे घरकुल योजनेसाठी अर्ज केला होता. तसेच अवशक्य कागदपत्रांची पूर्तता ही केल्याचा दावा व्हिडिओ मध्ये केला आहे. त्याच्या घरी आई बहीण आणि भाऊ असा परिवार असून रणजित यांच्यावरच घराची संपूर्ण जबाबदारी आहे. गेल्या वर्षी आलेल्या चक्री वादळात घर पूर्णपणे कोलमडून गेलं आणि सध्या गावच्या समाजमंदिरात राहण्याची पाळी या कुटूंबावर आली आहे. सदर घटनेची दखल घेत प्रशासन या युवकाला लवकरच न्याय मिळवून देईल हीच अपेक्षा.



सदरच्या घटनेवर स्वराज्य प्रतिष्ठाण रायगड चे संस्थापक अध्यक्ष भास्कर भाई कारे यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. येत्या काही दिवसात या अर्जाची दखल नाही घेतली तर प्रशासनाविरोधात भीक मांगो आंदोलन करणार असल्याचे ही त्यांनी म्हसळा लाईव्ह ला सांगितले आहे.

Post a Comment

أحدث أقدم

नक्की वाचा