कोकणच्या विकासासाठी भरघोस निधी उपलब्ध केला जाईल - उपमुख्यमंत्री अजित पवार


 श्रीवर्धन प्रतिनिधी :- तेजस ठाकूर

     दि. ४ जून हा दिवस श्रीवर्धनकरांसाठी एक ऐतिहासिक दिवस लक्षात राहील. त्याचं कारण असं ३ जून २०२० रोजी झालेल्या चक्रीवादळाने श्रीवर्धनच्या सौंदर्याचे वैभव उन्मळून पडल्याने श्रीवर्धन वासीयांवर मोठं संकट उभे राहिले होते. श्रीवर्धनचे गतवैभव मी पुन्हा उभा करीन असे आश्वासन ज्यांनी दिले ते मा. खा. सुनील तटकरे यांनी मा. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संपर्क साधून श्रीवर्धन  नगरपरिषदेचा पाणीपुरवठा प्रकल्प व श्रीवर्धन समुद्र किनाऱ्याचे सुशोभिकरण भूमिपूजन सोहळा हा दिनांक ४ जून २०२१ रोजी करण्यात आला. श्रीवर्धनमध्ये वाढती लोकसंख्या व पर्यटन स्थळ या दृष्टिकोनातून पाणीपुरवठा प्रकल्प व समुद्रकिनाऱ्याचे सुशोभीकरण हे नक्कीच श्रीवर्धनकरांच्या पर्यटन व्यवसायाला चालना देण्यात महत्त्वाची भूमिका ठरेल.
      श्रीवर्धन समुद्र किनाऱ्याचे सुशोभीकरण २०१२ साली करण्यात आले होते. आज ह्या सुशोभीकरणाला ९ वर्षे झाल्याकारणाने त्याची दुरुस्ती आपण करीत आहोत व लहान मुलांच्या आरोग्यासाठी ओपन जिमची व्यवस्था त्या ठिकाणी करण्यात येणार आहे. यासाठी शासनाकडून ३० कोटीचा निधी मंजूर केलेला आहे. आज दोन्ही कामांचे भूमिपूजन मा. उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते झाले व आजपर्यंत पहिल्यांदा श्रीवर्धन शहरात उपमुख्यमंत्री आले याबद्दल मला त्यांचे आभार मानावे असे वाटते. असे संभाषण पालकमंत्री आदिती तटकरे यांनी केले.
      गेल्या वर्षी म्हणजेच ३ जून २०२० रोजी श्रीवर्धन तालुक्यात चक्री वादळाने थैमान घातले होते. काल ह्या दुर्दैवी घटनेला बरोबर एक वर्ष पूर्ण होत आहे. ज्या वेळेस मी येथे आलो तेव्हा डोळ्यातून अश्रू मी थांबवू शकलो नाही अशी भयानक परिस्थिती श्रीवर्धनची झाली होती. परंतु त्याच वेळेस मी जनतेला म्हटले होते की अगोदर प्रमाणे पुन्हा गतवैभव मी मा. अजितदादा यांच्या आशीर्वादाने उभा करेन. असे वक्तव्य खासदार सुनील तटकरे यांनी केले.
      योगायोग असा की मी खूप दिवसांपासून अजित दादांना श्रीवर्धनला येण्यासाठी विनंती करीत होतो. आणि त्यांनी विनंतीला मान देऊन आजच्या दिवशी चक्रीवादळाला एक वर्ष पूर्ण होऊन श्रीवर्धनचे गतवैभव पुन्हा उभारून तुम्ही श्रीवर्धनला भेट दिली याबद्दल मी आनंद व्यक्त करतो. सिंधुदुर्ग पासून ७२० कि.मी. लांबीचा समुद्रकिनारा आहे. या ठिकाणी अनेक कामांचे प्रकल्प होत आहेत. तसेच बाणकोट बागमंडला या सागरी महामार्गसाठी २५० कोटींचा निधी दिला असून अजूनही ते बांधकाम रखडलेला आहे. त्याची दखल मा. उपमुख्यमंत्री साहेब यांनी घ्यावी व लवकरात लवकर ते काम पूर्ण कसे होईल ह्या हेतूने पावले उचलावीत असे खासदार सुनील तटकरे यांनी म्हटले.
      कोरोनाचे सावट व ह्या महामारी मधून जग पहिल्यांदाच जात आहे. अनेक जिवाभावाची माणसे आपल्याला सोडून जात आहेत. हा आजार कसा व कोणावर येईल ते सांगता येत नाही. काळजी घेणे, अंतर ठेवणे, मास्क व सॅनिटायझर चा वापर करणे त्याच्यासोबत शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करणे, ठरवून दिलेल्या नियमांचे पालन न झाल्यास त्यांना जीवाची किंमत मोजावी लागेल. त्यामुळे दिलेल्या नियमांचे पालन करून शासनाला मदत करावी. असा संदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जनतेला दिला.
      बऱ्याच दिवसापूर्वी मला सुनीलजी ने सांगितलं होतं की आपल्याला ४ जूनला श्रीवर्धनला जायचं आहे. कालच रात्री कोकणच्या परिसरामध्ये आलो आणि आता तुमच्या सगळ्यांचे उपस्थितीमध्ये आपण त्या पाणीपुरवठा प्रकल्पांचं भूमिपूजन आणि श्रीवर्धन समुद्रकिनारी  सुशोभीकरणाच्या कामाचे भूमिपूजनही पार पडले. श्रीवर्धन शहराच्या नागरिकांसाठी तसेच शहराला भेट देणाऱ्या पर्यटकांच्या दृष्टीने देखील हे दोन्ही प्रकल्प अत्यंत महत्त्वाचे आहेत.झालेल्या चक्रीवादळाचे उर्वरित पंचनामे शासनाला योग्य त्या प्रकारे सादर करावेत तसेच पुढील होणाऱ्या  कामांबद्दल चांगल काम झालं तर मी तोंडावर सांगेन की चांगले काम झाले. पण वाईट काम झालं तर मग त्या कॉन्ट्रॅक्टरला ब्लॅक लिस्टला टाकायला मागेपुढे बघत नाहीत आणि कारवाई करायला पण मागे पुढे बघणार नाही. तर त्या सगळ्याचा विचार करून  कॉन्ट्रॅक्टरने दहादा विचार करावा, अधिकाऱ्यांनी पन्नास वेळा विचार करावा असे स्पष्ट शब्दात तुम्हाला सूचना देत आहे. तसेच महाराष्ट्राला देखील माहित आहे की मी स्पष्ट  बोलतो. परंतु एकंदरीत मी कुणाचा अनादरसुद्धा करत नाही. चुकीचा असेल तरच बोलतो. त्याची नोंद कृपा करून घ्यावी. असे स्पष्ट शब्दांत वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
      या उद्घाटन सोहळ्याच्या वेळी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच खासदार सुनील तटकरे, पालकमंत्री आदिती तटकरे मा. आमदार अनिकेत तटकरे, जिल्हाधिकारी निधी चौधरी त्याचबरोबर जिल्हा पोलिस अधिकारी अशोक दुधे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

أحدث أقدم

नक्की वाचा