म्हसळा (वार्ताहर)
जैन आचार्य यांचा पुतळा जाळून त्यांचा अवमान करणाऱ्या तसेच समाजाची बदनामी करीत जैन समाजाचा अपप्रचार करणाऱ्या अनोप मंडल या संस्थेचा म्हसळा तालुक्यातील जैन बांधवांनी गुरुवारी म्हसळा पोलीस स्टेशचे पोलीस उपनिरीक्षक उद्धव सुर्वे यांना कारवाई करणाऱ्या संभदीचे निवेदन देऊन निषेध केला. यावेळी सुरेश जैन , रणजित जैन, हितेश जैन, चेतन जैन, राहुल जैन, कल्पेश जैन, विवेक जैन, विनोद ओसवाल उपस्थित होते.
पोलीस उपनिरीक्षक उद्धव सुर्वे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अनोप मंडल ही जैन आणि हिंदू विरोधी संघटना असून राजस्थान, गुजरात, महाराष्ट, हरियाणा आणि उत्तरप्रदेशातील ग्रामीण भागात जैन धर्म, जैन साधू आणि साध्वी यांच्याविरुद्ध लोकांच्या मनात विपर्यस्त विचार पसरविण्याचे काम करीत आहेत. भारतासह जगभरात येणारे प्रत्येक संकट आणि नैसर्गिक आपत्तीला जैन लोक कारणीभूत असल्याचा अपप्राचारही ही संघटना गावा गावात करीत आहे. भूकंप, महापूर, आतंकवादी हल्ले आणि ग्लोबल वार्मिंगलाही जैन समाजच कारणीभूत असल्याचे नाहक पसरविले जात आहे. जैन साधू आणि साध्वी हे काळी जादू करुन महापूर, कोरोनासारखे साथीचे आजार आणल्याचाही या अपप्रचारात समावेश आहे. रस्ते अपघातात अनेक पायी जाणाºया जैन साधू आणि साध्वींचे अपघाती निधन झाले आहे. शेकडो साधूंच्या या अपघाती मृत्यु होण्यामागेही अनोप मंडल संघटनेचा हात असण्याची भीतीही जैन संघटनेने व्यक्त केली आहे. अनोप मंडलची चौकशी केली जावी. या संस्थेचे प्रमुख व त्यांच्या साथीदारांवर कडक कारवाई केली जावी. त्याचबरोबर या संस्थेकडून चालविण्यात येणारे संकेतस्थळ, ट्वीटर, एफबी, व्हॉटसअॅप आणि यूटयूब सारखी सोशल मिडियाची खातीही बंद केली जावी. तसेच या मंडळाविरुद्ध फौजदारी कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली आहे.
إرسال تعليق