म्हसळा शाळा नं.१ने केला वृक्ष वृध्दी दिन साजरा :मुख्याध्यापिका दातारबाईंच्या कल्पकतेने म्हसळा करानी केले निर्सगावर प्रेम
(म्हसळा प्रतिनिधी)
आज वृक्ष वृध्दी दिनाचे निमीत्ताने म्हसळा शाळा म्हसळे नं.१ च्यामुख्याध्यापिका सौ.शुभदा दातार व अन्य शिक्षक वृंदानी वृक्षांच्या प्रती विद्यार्थी,पालक व ग्रामस्थ यांचे मित्रत्वाचे नाते वृद्धिंगत करण्यासाठी फ्रेंडशिप लेस बांधून कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवरांचे हस्ते कडुनिंब,आवळा, जांभूळ,गुलमोहर,सोनमोहर,नारळ,लिंबू यासारख्या वृक्षांची लागवड करण्यात आली यावेळी वृक्षाची पूजा,वृक्षाना फ्रेंडशिप लेस बांधून झांडाचे व पर्यावरणाचे रक्षण करण्याची हमी देण्यात आली. यावेळी वरिष्ठ विस्तार अधिकारी संतोष शेंडगे , श्रीमती रेखा धारिया, शकुंतला जाधव , म्हसळा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा श्रीमती जयश्री कापरे, केंद्रप्रमुख अनिल ठाकूर ,विकास धारीया,प्रियंका चव्हाण, ज्योती करडे,सुमित्रा खेडेकर,रूचिता मेथा , कल्पना पाटील ,वंदना खोत ,इंदिरा चौधरी, अंगणवाडी सेविका व मदतनीस श्रीमती मयुरी दर्गे,समिधा वेदक असा शिक्षक वृंद उपस्थित होता.
वृक्ष माणसाच्या मुलभूत गरजा अन्न,वस्त्र, निवारा,शिक्षण आणि आरोग्य पूर्ण करतात. त्यांच्या प्रती प्रेम व्यक्त करणे हे आपले कर्तव्य आहे. तसेच कोरोना महामारीच्या कालावधीत आँक्सिजनच्या कमतरतेमुळे अनेकांना प्राण गमवावे लागले म्हणूनच झाडे लावणे महत्त्वाचे असून त्यांचे संवर्धन करणे तितकेच महत्त्वाचे आहे.असा हा कल्पक कार्यक्रम शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.शुभदा दातार व अन्य शिक्षक वृंदानी राबविला, त्याना स्थानिक मंडळींचा विशेष पाठींबा असतो याचे कौतुक कार्यक्रमासाठी आलेले वरिष्ठ विस्तार अधिकारी संतोष शेंडगे आणि उपस्थितानी केले.
إرسال تعليق