श्रीवर्धन मधल्या स्वराज्याचे शिवभक्त ह्या समूहाने घेतला पुढाकार
श्रीवर्धन प्रतिनिधी तेजस ठाकूर
गेल्या एक वर्षात श्रीवर्धनमध्ये दोन चक्रवादळ येऊन गेले. याचा फटका नागरिकांना बसलाच, परंतु निसर्गसौंदर्याने नटलेल्या श्रीवर्धन शहराच्या हिरवळीला देखील प्रचंड प्रमाणात नुकसान सहन करावे लागले. श्रीवर्धन समुद्रकिनारी असलेल्या सुरूची झाडे तसेच १५० ते २०० वर्षांपूर्वी चे मोठमोठी झाडे उन्मळून पडली. त्याचबरोबर नारळ सुपारीच्या बागा नेस्तनाबूत अवस्थेत दिसण्यात आलेल्या, परंतु श्रीवर्धन मधल्या नागरिकांनी अशा प्रकारे वृक्षरोपणाचे आयोजन करून निसर्गाची हानी भरून काढण्याचा प्रयत्न नागरिकांमधून होत आहे.
स्वराज्याचे शिवभक्त या समूहाने श्रीवर्धनमधील तांबडी या डोंगराळ ठिकाणी विविध जातीच्या ११० रोपांची लागवड केली. दिवसेंदिवस पर्यावरणाचा समतोल बिघडत असून मोठय़ा प्रमाणावर होत असलेली वृक्षतोड, जंगलांचा नाश या बाबी त्यासाठी कारणीभूत आहेत. पर्यावरणाच्या बिघडलेल्या समतोलामुळे अनियमित व अपूर्ण पर्जन्यमान, भयानक उष्णता अशा संकटांना तोंड देणे भाग पडत आहे. यावर प्रभावीपणे मात करायची असल्यास काळाची गरज ओळखून पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी मोठय़ा प्रमाणावर वृक्षारोपण व त्याचे संवर्धन करणे आवश्यक आहे ही बाब लक्षात घेऊन स्वराज्याचे शिवभक्त यांनी सदरचे वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित केले सदरच्या कार्यक्रम प्रसंगी पोलीस उपनिरीक्षक उमेन्द्र खेराड, वनक्षेत्रपाल मिलिंद राऊत तसेच स्वराज्याचे शिवभक्त समूहातील देवेश पवार सागर कडू इशांत पोलेकर गणेश कोरगावकर ओमकार बोरकर आदित्य पवार मेहुल खडके आधी वृक्षारोपण प्रसंगी उपस्थित होते. सध्याच्या तरुणाईने अशाप्रकारे स्तुत्य उपक्रम राबविल्याने विविध स्तरातून त्यांचे कौतुक केले जात आहे.
मागच्या वर्षीच्या तीन जून रोजी झालेल्या निसर्ग चक्रीवादळाने मोठमोठ्या झाडांचे नुकसान केले. काही झाडे प्रचंड प्रमाणात उन्मळून पडलेली होती. ही नुकसान भरपाई भरून काढण्यासाठी सामाजिक बांधिलकी राखत वृक्ष रोपणाचा कार्यक्रम आयोजीत केला. गणेश कुडगावकर (निसर्गप्रेमी)
إرسال تعليق