टीम म्हसळा लाईव्ह
न्यु इंग्लिश स्कूल खरसई चे सहशिक्षक श्री एन .ई .काटे सर (गणित )विषयाचे पारंगत शिक्षक ८-७-९३ ला खरसई हायस्कुलला नेमणूक २८ वर्षांच्या प्रदीर्घ आपल्या अनुभवाचा ग्रामीण भागातील विध्यार्थ्यांना ज्ञानरुपी शिक्षण देण्याचा कार्य केले.
शांत व संयमी विध्यार्थ्यांना आपलेसे करणारे श्री काटे सर यांनी आपल्या कुटुंबाबरोबर अनेकांना मदतीचा हात देऊन सहकार्य केले. 28 वर्षे न्यु इंग्लिश स्कूल खरसई येथे ज्ञानदानाची सेवा केल्यानंतर आज ते सेवानिवृत्त झाले.
कार्यक्रम प्रसंगी हायस्कूलचे चेअरमन जेष्ठ नेते अध्यक्ष परशुराम मांदाडकर यांच्यासह आगरी समाज अध्यक्ष नामदेव खोत सरपंच श्री निलेश मांदाडकर, देवजी खोत तुकाराम मांदाडकर, हरिचंद्र कांबळे नारायण मेंदडकर भालचंद्र म्हसकर सहदेव म्हात्रे भास्कर कांबळे मुख्याध्यापक मुलांनी सर सातपुते सर पाटील सर हजबे मँडम, पयेर आदी मान्यवर उपस्थित होते
إرسال تعليق