संजय खांबेटे : म्हसळा
कोरोनाचा बंदोबस्त करण्यासाठी आज गुरुवार दिं.२४ जून (शनिवार) पासून १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांसाठी मोफत लस देण्याचा निर्णय शासनाने घेतलाआहे. आज पासून रायगड जिल्ह्यातील सर्व PHC प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये (सब सेंटर वगळता) 18 ते 44 वर्ष वयोगटातील लाभार्थींसाठी लसीकरण सुरू करण्यात येणार असल्याचे आरोग्याचे सूत्रानी सांगितले. लसीकरण केंद्रावरील उपलब्ध लस साठ्यातून 18 ते 44 व 45+ वर्ष वयोगटातील लाभार्थी साठी लसीकरण करण्यात यावे अशा सूचना संबंधीताना देण्यात आल्या आहेत. यावेळी 2nd डोस घेण्यास आलेल्या लाभार्थींना preference ने लस देण्यात यावी अशा स्पष्ट सूचना आहेत.18 ते 44 वर्ष वयोगटातील लाभार्थींना फक्त PHC मध्ये लसीकरण करण्यात येणार आहे. कोणत्याही सब सेंटर मध्ये 18 ते 44 वयोगटा तील लाभार्थींना लसीकरण करता येणार नसल्याचे आरोग्य सूत्रांकडून स्पष्ट करण्यात आले.
إرسال تعليق