टीम म्हसळा लाईव्ह
भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेश सचिवपदी रविंद्र मुंढे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचे नियुक्ती पत्र सोमवारी (21 जून) रविंद्र मुंढे यांना देण्यात आले आहे.
भाजपचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिलेल्या नियुक्तीपत्रात, रविंद्र मुंढे यांच्या समााजिक व राजकीय अनुभवाचा उपयोग पक्ष संघटनेच्या कार्यवाढीसाठी निश्चितपणे होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. तसेच ते पक्षाने दिलेली जबाबदारी सर्वांना सोबत घेऊन यशस्वीरित्या पार पाडतील, असा विश्वासही व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान, रविंद्र उर्फ रवि मुंढे यांची प्रदेश सचिवपदी नियुक्ती झाल्यानंतर त्यांच्यावर कार्यकर्त्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव करण्यात येत आहे. या निवडीमुळे दक्षिण रायगडमध्ये बळ मिळणार आहे
إرسال تعليق