महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदे तर्फे गोरेगाव, नांदवी प्रा.आ.केंद्रास मदत साहित्याचे वाटप.



पन्हळघर बुद्रुक १६  मे (राम भोस्तेकर) :-  रायगडातील प्राथमिक विभाग महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद सामाजिक कामात नेहमीच अग्रेसर राहिली आहे. राष्ट्रहित,विद्यार्थी हित,शिक्षण हित, शिक्षक हित संघटनेचे ब्रीदवाक्य आहे. 
ज्या वेळेस देशावर संकट आले त्यावेळेस परिषदेचा प्रत्येक कार्यकर्ता हिरहिरीने राष्ट्रीय कार्यात धावून गेला  आहे.
संघटनेचे संस्थापक आम.संजयजी केळकर यांच्या मार्गदर्शनाखाली,राज्याध्यक्ष मा. राजेशजी सुर्वे यांच्या संकल्पने नुसार शनिवारी राज्यभरात महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभागाच्यावतीने अनेक समाजोपयोगी उपक्रम सुरु केले आहेत.रक्तदान, अन्नदान,कोविड केंद्र,आर्थिक निधी मदत ,वैदयकीय उपकरणे व साहित्याचे वाटप याचा समावेश आहे.या उपक्रमांतर्गत रा. जिल्ह्यात जिल्हाध्यक्ष संजयजी निजापकर  यांच्या नेतृत्वाखाली कोविड सहाय्यता अभियान चालू केले असून शनिवार दिं. १५ मे रोजी गोरेगांव,व नांदवी प्रा.आरोग्य केंद्रात रायगडच्या माणगांव येथील महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद शाखेच्या वतीने
 मा.तालुकाध्यक्ष सुधाकर करकरे, संजय पाटोळे,गणेश निजापकर,रविंद्र पालकर,संदिप साळवी,सुजित भोजने, गणेश खामकर,गिरीधर कुथे,भाऊ गोरेगावकर,सुरेंद्र मनवे,परेश अंधेरे, कैलास महाजन,सत्यवान मांजरे,मिलिंद सुर्यवंशी,मुकेश भोस्तेकर यांच्या उपस्थितीत डॉ.गोरेगावकर,तर नांदवी प्रा.आ.केंद्रात श्रीम.नांदगावकर,सौ.म्हात्रे,भोईर आण्णा,सुरेंद्र पाटील,
रुपेश नांदवीकर ,लॅब सहाय्यक यांच्याकडे 10फेस शील्ड,1ऑक्सीमिटर,1थरमल गन सॅनेटायझर पाच लिटर एक कॅन एन ९५ चे १०० नग मास्क
जमा झालेल्या शिक्षक मदत निधीमधून सुपूर्द करण्यात आले. प्रा.आ.केंद्रातील सर्व कर्मचारी या वेळी उपस्थित होते.

Post a Comment

أحدث أقدم

नक्की वाचा