लाभ घेण्याचे जिल्हा प्रशासन व बीएसएनएलचे आवाहन
अखंडित सुरु ठेवण्याकरिता बीएसएनएल कटिबद्ध
टीम म्हसळा लाईव्ह
पुढील दोन दिवसात होणाऱ्या संभाव्य चक्रीवादळाच्या परिस्थितीत आपत्ती व्यवस्थापन सूचनेनुसार, बीएसएनएलने आपले मोबाईल नेटवर्क सर्व इतर कंपन्यांच्या मोबाईलधारकांकरिता खुले केले आहे. त्यामुळे आपल्या मोबाईलची सेवा खंडित झाल्यास बीएसएनएलच्या या नि:शुल्क विशेष सेवेचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासन आणि बीएसएनएलने केले आहे.
चक्रीवादळादरम्यान व वादळानंतर दूरसंचार व दळणवळण सेवा अखंडित सुरु ठेवण्याकरिता बीएसएनएल सदैव कटिबद्ध आहे. प्राप्त सूचनेनंतर कोणत्याही मोबाईल ग्राहकाला बीएसएनएलचे नेटवर्क आपल्या मोबाईलमधून मॅन्यूअली (Manually) सिलेक्ट करावे लागेल व त्याकरिता कोणतेही वेगळे शुल्क नाही लागणार नाही.
तरी नैसर्गिक आपत्तीच्या काळात विशेषतः पुढील दोन दिवसात होणाऱ्या संभाव्य चक्रीवादळाच्या परिस्थितीत आपल्या मोबाईलची सेवा खंडित झाल्यास बीएसएनएलच्या या नि:शुल्क सेवेचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासन आणि बीएसएनएलने केले आहे.
إرسال تعليق