म.न.से.च्या प्रयत्नाने सिलीम येथील उपकेंद्रात लसीकरण सुरू



पन्हळघर बुद्रुक ( राम भोस्तेकर ) :- शासनाच्या माध्यमातून मांजरोणे विभागातील सिलीम येथे २००६ पासून १२ गावासाठी लाखो रुपये खर्च करून वैद्यकीय उपकेंद्र बांधण्यात आले मात्र उपकेंद्रात वैद्यकिय अधिकारी यांची कायम स्वरुपी नियुक्ती नसल्याने ग्रांमस्थांना १२ ते १५ कि.मी. अंतर पार करून वैद्यकीय सेवेसाठी जावे लागत होते. 
या मुद्द्याच्या आधारे माणगांव तालुक्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून हे उपकेंद्र चालू करण्यासाठी प्रांतकार्यालाय माणगांव येथे दिं. २९ एप्रिल २०२१ रोजी निवेदन दिले होते व सतत याचा पाठपुरावा केला.दरम्यान ११ मे पासून सिलीमच्या उपकेंद्रात कोविड १९ बाबत चे लसीकरण सुरु करण्यात आले असून उपकेंद्र सुरू करण्यात मनसेला यश प्राप्त झाले आहे.यामुळे ग्रांमस्थांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
    यावेळी जिल्हाध्यक्ष देवेंद्र गायकवाड,उपजिल्हाध्यक्ष गोपाळ पवार,तालुकाध्यक्ष ऋषभ वातेरे,महेश सावर्डेकर,रोहन कांबळे,अमोल पवार, प्रमोद घोले,राजेश महाडिक,सोहिल महाडिक,प्रतिक तटकरे,अक्षय खेडेकर,मनोज घोले,मनोज महाडिक, लवेश घोले,भावेश घोले,सुनील शिर्के,  आदी मनसे कार्यकर्त्यासह सिलीम गांव अध्यक्ष सखाराम खेडेकर,उपाध्यक्ष,गोविंद महाडिक,  लक्ष्मण महाडिक,भिकू घोले,संदेश तटकरे,महादेव महाडिक,मोहन महाडिक,राजाराम कदम,महाडिक वसंत घोले महिला अध्यक्ष सो कविता घोले,सुवर्णा घोले,रजनी महाडिक, शानुबाई महाडिक, हिराबाई कांबळे, आदी महिला उपस्थित होते. प्रसंगी उपकेंद्रासाठी जागा देणा- या शानुबाई व सुलोचना महाडिक यांच्या हस्ते उपकेंद्रात लसिकरणाचे उद्घाटन करण्यात आले.

Post a Comment

أحدث أقدم

नक्की वाचा