संजय खांबेटे : म्हसळा
म्हसळा तालुका "टॅंकर मुक्त" आसल्याचे शासन सांगत असले तरी तालुक्यातील अनेक पाणी पुरवठा योजना सदोष आहेत. त्यामुळे तोंडसुरे प्रादेशिक नळ योजनेतील १७गाव-वाड्याना पाणीनाही.अशी स्थिती तालुक्यातील अन्य गावातून सुद्धा आहे. टँकरमुक्त म्हसळा तालुक्यातील म्हसळा शहरासह १७ गाव-वाड्यासह ३० % गावे टंचाईला तोंड देत आहेत.
तोंडसुरे प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजनेत तोंडसुरे,वरवठणे,आगरवाडा, पेडांबे, रेवली,बनोटी,खारगाव खुर्द व सकलप अशी ८गावे व बाऊल कोंड, पेडांबे हरीजन वाडी आणि त्यांच्या बौध्दवाडया,आदीवासी वाडया आहेत.या सार्वांची लोकसंख्या सुमारे ८ हजार आहे. २००१ साली ही नळ पाणी महाराष्ट्र जिवन प्राधिकरणने पूर्ण केली तर या योजनेची देखभाल दुरुस्ती जिल्हा परिषदेचा ग्रा.पा. पुरवठा विभाग करीत आहे. मागील काही वर्षाचा अनुभव पहाता एप्रिल-मे या टंचाई च्या काळातच अनेक वेळा,सदोष पाईप लाईन, साठवण टाक्या,पाणी पंप तर धरणाच्या दुरुस्ती यामुळे दरवर्षी पाणी पुरवठा खंडीत का होतो या स्थानीकांच्या प्रश्नाला शासन मात्र अनुत्तरीत किंवा टोलवाटोलवी का? अशीही गावा-गावांतून चर्चा आहे.
"बिघाड झाल्यापासून चार दिवसांत दुरुस्ती न होणे म्हणजे शासन कृत्रिम पाणी टंचाई करत आहे .येत्या दोन दिवसांत तोंडसुरे प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजनेतून पाणी पुरवठा सुरु न झाल्यास नागरिकांतून उद्रेक होईल याची शासनाने नोंद घ्यावी.महादेव पाटील,माजी सभापती,पं.स. म्हसळा
" तालुक्यात अनेक वेळा विजुरवठा खंडीत होणे, कमी आधिक विजेचा दाब असणे या तांत्रिक कारणाने तसेच तालुक्यात गतिमान व एक्सपर्ट तांत्रिक सेवेचा आभाव या कारणाने पाणी पुरवठ्यांत खंड होतो"
ग्रामिण पाणीपुरवठा , उपविभाग, म्हसळा
إرسال تعليق