"ताउत्के" चक्रीवादळाने म्हसळा करांचे आंबा बागायतींसह घरांचे केले नुकसान : जोरदार वाऱ्याने तालुक्यात होते भितीचे वातावरण.




संजय खांबेटे : म्हसळा
"ताउत्के" चक्रीवादळाचा प्रभाव म्हसळा तालुक्यातील राजपुरी खाडी लगतच्या परिसरांत मोठया प्रमाणात दिसला.रात्री ११ते पहाटे ४ वाजे पर्यंत सोसाट्याचा वारा व मुसळधार पाऊस असे तालुक्यात चित्र होते.तालुक्यात काल झालेल्या चक्रीवाद ळाने आत्तापर्यंत आलेल्या माहीतीनुसार २७४ घरांचे अंशतः नुकसान झाले, या कालावधीत ४४ मि.मि. पावसाची नोंद झाली.बहुतांश घरे म्हसळा शहरा सकट पाभरे, खारगाव (खु ),खरसई, तुरुंबाडी, मेदडी, वारळ अशी खाडी लगतची आसल्याची माहीती म्हसळा तालुक्याचे आपत्ती व्यवस्थापन प्रमुख तथा तहसील दार शरद गोसावी यानी दिली.तालुक्यात ८४ महसुली गावे असून५९ हजार ९१४ लोकसंख्या आहे. खाडीलगतच्या गावांपैकी बधोक्याची घरे असणाऱ्या १३४ कुटुंबातील ४९६ नागरिकाना सुराक्षित जागी स्थलां तरीत करण्यात आल्याचे महसुल प्रशासना ने सांगितले.

"ताउत्के" चक्रीवादळाचे सोसाट्याचा वारा व मुसळधार पाऊस या कालावधीत म.रा. वि.विभागाने सावधगिरीची अपाययोजना अवलंबल्याने विद्युत पुरवठा दिर्घकाळ खंडीत होण्याचा प्रकार कमी झाला आजच सकाळी ११ वाजेपर्यंत विज प्रवाह पुरवठा तालुक्यातील बहुतांश भागात पूर्ववत सुरु करण्यात आला".
पटवारी, कार्यकारी अभियंता,म.रा.वि.वि. कंपनी, म्हसळा

"तालुक्यातील रहाती घरे, गुरांचे गोठे, पशुधन आंबा- काजू बागायती व अन्य नुकसानीचे सर्वेक्षण व पंचनामे सजातील तलाठी,कृषिसहाय्यक ,पशुपर्यवेक्षक ,ग्रामसेवक करीत आहेत."
-के.टी. भिंगारे,नायब तहसीलदार म्हसळा.

" दुपारी १ ते ३.३० च्या दरम्यान १०० ते १२० कि.मी. वेगाने  फारच सोसाट्याचा वारा सुटला होता.यावेळी पुणे दिघी बंदर या  753F या राष्ट्रीय महामार्गावर महाकाय चिंचेचे झाड पडल्याने अर्धा तास माहामार्ग बंद होता. तहसीलदार शरद गोसावी यानी दोन J.C.B च्या मदतीने  राष्ट्रीय महामार्ग सुरू केला  "

Post a Comment

أحدث أقدم

नक्की वाचा