तळा तालुक्यातील ताऊक्ते वादळाने २३ घराचे नुकसान : सुदैवाने जिवितहानी नाही



तळा-किशोरपितळे
तळातालुक्यात ताऊक्ते चक्री वादळाने काल सायंकाळ पासून थोड्या प्रमाणात सुरुवात केली होती मात्र रात्री २वाजण्याच्या सुमारास वेग वाढला होता.या वादळाने विशेष नुकसान झाले नसुन तालुक्यातील २३ घरांचे अंशत: नुकसान झाले असून १ घराचे पूर्णता नुकसान झाले आहे.पावसाचे सरासरी प्रमाण२१ मि.मी.असून ३६ कुटुंबातील १३५ जणांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत करण्यात आले आहे. प्रशासनाने दिलेल्या सुचनाचे नागरिकांनी योग्यती काळजी व खबरदारी घेतली असल्याने मोठे नुकसान टळले असून जीवीतहानी झाली नाही.व कोठे हि झाडे कोसळलेली नाहीत सर्व महत्वाचे रस्त्यावर अडचण नाही सर्व सुरक्षितआहे.तालुक्यात सर्व संवेदनशील भागाची पहाणी केली आहे अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन प्रमुख तथा तहसीलदारअण्णापा कनशेट्टी यांनी प्रतिनिधीना माहिती दिली

Post a Comment

أحدث أقدم

नक्की वाचा