तळा शहरात पोलिसांची कडक नाकाबंदी ; विनाकारण फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई.



तळा-किशोर पितळे
राज्यात कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे प्रशासनाने लॉकडाऊन व संचारबंदी जाहीर केली आहे.तसेच साथरोग प्रतिबंध कायदाही लागू करण्यात आला आहे.या पार्श्वभूमीवर तळा पोलीस ठाण्याचे पोलीस.निरीक्षक गेंगजे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय शिवराज खराडे व पी. एस.आय सोनाली जवादे  यांच्या अध्यक्षतेखाली तळा पोलिसांनी कडक नाकाबंदी सुरू केली आहे. तळा तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी प्रमाणात असली तरी तालुक्यात गर्दीद्वारे संसर्ग होऊ नये याची खबरदारी पोलीस प्रशासनाकडून घेण्यात येत आहे. बाजारपेठेत जीवनावश्यक वस्तूंची खरेदीकरण्यासाठी नागरिकांची गर्दी वाढत असल्याने ती रोखण्यासाठी पोलिसांकडून कडक नाकाबंदीकरण्यात येत आहे. शहरातविनाकारणफिरणाऱ्यामोटारसायकल व चार चाकी गाड्या गर्दी साठी कारणीभूत ठरत असल्याने आशा विनाकारण फिरणाऱ्यामोटारसायकल स्वार व चारचाकी गाड्यांवर पोलिसांकडून दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.

Post a Comment

أحدث أقدم

नक्की वाचा