तळा तालुक्यातील नागरिकांमध्ये चक्रीवादळाची दहशत



निसर्ग चक्रीवादळाच्या आठवणीने आजही भरते धडकी.


तळा-किशोर पितळे
रायगड जिल्ह्याच्या किनारपट्टीवर चक्रीवादळाचा तडाखा बसणार असल्याचा ईशारा हवामान खात्याने वर्तविला आहे.त्यामुळे तळा तालुक्यातील नागरिकांमध्ये चक्रीवादळाची दहशत पसरलीआहे.गेल्यावर्षीआलेल्या निसर्ग चक्रीवादळाचा रायगड जिल्ह्याला मोठा फटका बसला होता.तळा तालुक्यातील गावागावातील बहुतांश घरांचे छप्पर वादळी वाऱ्यामुळे उडून गेले होते. शेतकऱ्यांच्या शेतीचे तसेच बागबागायतींचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. वादळी वाऱ्याच्या अतिवेगामुळे तालुक्यातील जवळ जवळ ९० टक्के विद्युत खांब कोसळल्याने जवळपास दोन महिने वीजपुरवठा खंडित झाला होता.त्यामुळे आधीच लॉकडाऊनमुळे मुंबईतून गावी आलेल्या चाकरमान्यांना विज पुरवठा खंडित,विजेअभावी पाणीपुरवठा खंडित,मच्छरांचा त्रास,नेटवर्क समस्या आशा विविध समस्यांचा सामना करावा लागला होता.निसर्ग चक्रीवादळाच्या या आठवणीने तळा वासीयांच्या मनात आजही धडकी भरते.त्यातच हवामान खात्याने पुन्हा चक्रीवादळाचा ईशारा दिल्याने नागरिकांमध्ये या चक्रीवादळाची दहशत निर्माण झाली आहे.गेल्या वर्षीच्या निसर्ग चक्रीवादळातूनसावरतअसतानाच पुन्हाचक्रीवादळाचा ईशारा देण्यात आला असल्याने पुढे आणखी कोणत्या समस्यांना सामोरे जावे लागणार आहे या विचारानेच तळावासीयांची झोप उडाली आहे.

Post a Comment

أحدث أقدم

नक्की वाचा