श्रीवर्धन शहरात तौक्ते वादळा निमित्त सिसकेप महाडचे पथक हजर


 श्रीवर्धन प्रतिनिधी:- तेजस ठाकूर

      अरबी समुद्रात घोंघावणारे तौक्ते चक्रीवादळ प्रचंड सक्रीय झाले आहे. सध्या हे चक्रीवादळ गुजरातच्या दिशेने सरकत आहे. लक्षद्वीप जवळ निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याची चक्रीवादळात रूपांतर झाले आहे. हवामान खात्याकडून मिळालेल्या माहितीनुसार श्रीवर्धन शहरात संध्याकाळी 6 नंतर पावसाला सुरुवात होईल व सोसाट्याचा वारा असेल. रात्री 2 च्या सुमारास वादळ, वारा व पाऊस सर्वोच्च तीव्रतेने असेल व त्या नंतर हळूहळू कमी होईल.
      स्थानिक प्रशासनाच्या आदेशानुसार श्रीवर्धन तालुक्यात रेस्क्यू च्या मदतीला सिसकॅप महाड या संस्थेला बोलवण्यात आले आहे. सिक्सकॅप महाडचे कार्यवाह प्रेमसागर मेस्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण टीम रेस्क्यू करणार आहे. या टीम मध्ये 30 जवान असून मागच्या वर्षीच्या 3 जूनला सुद्धा त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावलेली होती. वन्यप्राण्यांना अशा आपत्तीमध्ये जीव वाचवणे, जखमी झालेल्या प्राणी व पक्षी यांना मदतीचा हात देणे हे त्यांचे उद्दिष्ट आहे. त्यासोबत नागरिकांना इतर अडचणी मध्ये मदत करणे हे सामाजिक कार्य सुद्धा ते करतात. वादळामध्ये रस्त्यांवर पडलेले झाड ते तोडून रस्ता मोकळा करण्यास करण्याचे काम मागच्या वर्षी त्यांनी शिताफीने केले होते व अनेक वन्य प्राण्यांना जीवन दिले होते.
      डोंगराळ भागातल्या नागरिकांना म्हणजेच धोंडगल्ली, मेटकर्णी, जीवना व इतर भागातील नागरिकांना सुरक्षित जागेच्या ठिकाणी स्थलांतरित करण्यात स्थानिक प्रशासनाने सांगितले आहे व प्रशासनाकडून योग्य ती खबरदारीची व्यवस्था करण्यात आली आहे.

Post a Comment

أحدث أقدم

नक्की वाचा