म्हसळा -प्रतिनिधी
राज्यात कोरोना प्रादुर्भाव कमी करण्यासाठी लॉक डाऊन हा एकच पर्याय म्हणून शासनाने 30 मे पर्यंत आहे त्या स्थितीत लॉक डाऊन करण्याचे ठरविले आहे.या वर नव्याने होणारी नियमावलीची अद्याप घोषणा झाली नसली तरी म्हसळा तालुक्यात दुकानांचे वेळा पत्रकात बदल झाला असल्याची मागील वर्षी मुलाखत दिलेली विडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल करून अफवा पसरविण्यात येत असल्याचे म्हसळा नगर पंचायतीचे मुख्याधिकारी यांनी प्रसिद्धी पत्रद्वारे पत्रकारांना कळविले आहे.या बाबतीत त्यांनी नागरिकांना सावधानता बाळगून दुकानाच्या वेळेत कोणताही बदल झालेला नाही असे कळविले आहे अधिक माहिती देताना 'स्थानिक वृत्तपत्राना' मागील वर्षी दिलेली मुलाखत ह्या वर्षी मुद्दाम काही व्यक्ती व्हायरल करून दुकान सकाळी ९ ते संध्याकाळी ५ पर्यंत चालू ठेवण्याचा संदेश व्हॉट्सअँप द्वारे फिरवीत लोकांची दिशाभूल करीत आहेत.या संदर्भात आम्ही पोलिस यंत्रणेला निदर्शनास आणून दिले आहे.तरी सर्वांना विनंती की सदरच्या संदेशा कडे दुर्लक्ष करणेत यावे. दुकानाच्या वेळेत बदल झाल्यास नगर पंचायती मार्फत लाऊड स्पीकरवर दवंडी देऊन नागरिकांना कळविण्यात येईल असा खुलासा म्हसळा नगर पंचायतीचे मुख्याधिकारी मनोज उकिर्डे यांनी जाहीर केला आहे.
إرسال تعليق