श्रीवर्धन प्रतिनिधी :- तेजस ठाकूर
ज्या प्रमाणे जागतिक स्तरावर मातृ दिन , पितृ दिन आणि आणखी काही दिवस साजरे केले जातात. त्याचप्रमाणे रुग्णालयमध्ये आपली सेवा देणाऱ्या परिचारिकांसाठी एक दिवस साजरा केला जातो. तो दिवस म्हणजे १२ मे. जागतिक परिचारिका दिनाची सुरुवात ही बरेच वर्षा आधी झालेली आहे, सुरुवातीला हा दिवस साजरा करण्यात येत नव्हता. परंतु १९७१ मध्ये आंतराष्ट्रीय नर्स परिषदचे आधुनिक नर्सिंग च्या फाऊंडर लेडी फ्लोरेन्स नायटिंगल यांचा जन्म ज्या तारखेला झाला त्या दिवसाला जागतिक नर्स दिवस म्हणजेच जागतिक परिचारिका दिवस म्हणून घोषित करण्यात आले. आणि तेव्हापासून संपूर्ण जगात १२ मे ला जागतिक परिचारिका दिवस म्हणून साजरे करण्यात येते.
परिचारिका म्हणजे रुग्णांलयामध्ये रुग्णांची सेवा करणारी व्यक्ती, सध्या च्या चालू असलेल्या कोरोना महामारी मध्ये बहुमोलाचे काम ते करत आहेत. रुग्णांना वेळोवेळी लागणाऱ्या गोष्टी पुरवणारी व्यक्ती, रुग्णांची चांगल्या प्रकारे निगा राखणारी व्यक्ती, या व्यक्तींचा आरोग्य क्षेत्रामध्ये खूप मोठे योगदान आहे. त्यांचे जीवन हे रुग्णांलयातील रुग्णांची सेवा करण्यात निघून जाते. जागतिक विध्यार्थी परिचारिका हा दिवस ८ मे ला १९९८ पासून साजरा केला जातो. आणि ६ मे ते १२ मे पर्यंत या आठवड्यात जागतिक परिचारिका दिवस म्हणून साजरा होतो.
सध्या चालू असलेल्या कोरोना युद्धामध्ये फ्रंटलाईन वर्कर्स ज्यांना आपण म्हणतो ते सर्व प्रशासकीय कर्मचारी, पोलीस कर्मचारी, आरोग्य कर्मचारी व इतर सेवा यांना स्वतःच्या आरोग्य सोबतच इतर नागरिकांचे आरोग्य निरोगी करण्याचे काम ते करत आहेत. त्यामध्ये बघता १२ मे रोजी जागतिक परिचारिका दिन श्रीवर्धन पोलीस दलाकडून साजरा करण्यात आला. यावेळी उपजिल्हा रुग्णालय मधील परिचारिका उपस्थित होते. यामध्ये कौतुकाची बाब बघता एक प्रशासकीय सेवा दुसऱ्या प्रशासकीय सेवेचा सत्कार करतो. ही एक श्रीवर्धनकरांसाठी अभिमानाची बाब म्हणता येईल.
श्रीवर्धन पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रमोद बाबर यांच्या कल्पनेतून हा सत्कार सोहळा आयोजित केला होता. त्यांनी उपस्थित सर्व परिचारिकांची स्वागत व सत्कार केला, आणि पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाच्या वेळी प्रांताधिकारी अमित शेडगे, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी किरणकुमार मोरे, तालुका आरोग्य अधिकारी दीपक पांडे, त्याचसोबत उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. महेंद्र भरणे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
"जागतिक परिचारिका दिन हा परिचारिकांच्या उपस्थितीमध्ये साजरा करण्यात आला त्याबद्दल आम्ही प्रथमतः पोलीस दलाचे आभार व्यक्त करतो. तसेच रुग्णालय मध्ये लागणारी सोयी-सुविधांची मदत भविष्यातही आमच्याकडून नक्कीच होईल असे मी शब्द देतो." - प्रांताधिकारी अमित शेडगे
"जागतिक परिचारिका दिन आम्ही साजरा केला. यावेळी उपजिल्हा रुग्णालयातील परिचारिका उपस्थित होते. सध्याच्या दिवसात फ्रन्टलाइन वर्कस म्हणून ते महत्त्वाची भूमिका बजावत आहेत." - प्रमोद बाबर, श्रीवर्धन पोलीस निरीक्षक
إرسال تعليق