कोरोना विषयी जनजागृती ला प्राधान्य द्या. -पालकमंत्री आदिती तटकरे




 कायद्याचा भंग करणार विरोधात गुन्हे दाखल करा

 उपजिल्हा रुग्णालयात ऑक्सीजन सिलेंडर चे उद्घाटन

 श्रीवर्धन प्रतिनिधी संतोष सापते

 कोरोना विषाणू चा वाढता प्रादुर्भाव समाजासाठी विघातक ठरत आहे.  प्रशासकीय यंत्रणा,  राजकीय नेतृत्व  आणि जनसामान्य व्यक्ती या सर्वांनी मिळून कोरोना विषयी सजग होणे गरजेचे आहे.  सर्वांनी कोरोना विषयी जनजागृती ला प्राधान्य देणे गरजेचे आहे असे प्रतिपादन रायगडचे पालकमंत्री आदिती तटकरे यांनी केले आहे . श्रीवर्धन शहरातील उपजिल्हा रुग्णालयात ऑक्सीजन सिलेंडर चे  उद्घाटन आदिती तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले. सदर प्रसंगी त्यांनी  उपजिल्हा रुग्णालयातील कोरोना रुग्णांवर देण्यात येणाऱ्या उपचाराविषयी सखोल चर्चा केली. रुग्णांसाठी अत्यावश्यक असणाऱ्या सर्व बाबींची पाहणी केली. उपजिल्हा रुग्णालयात कोरोना रुग्णांसाठी चाळीस बेडची व्यवस्था करण्यात आलेली आहे त्यासोबत तालुक्यातील कोरोनाचा चा प्रादुर्भाव लक्षात घेतात  आराठी येथे नवीन रुग्णांसाठी 30 बेडची व्यवस्था करणे विषयी सूचना करण्यात आली. आदिती यांनी उपजिल्हा रुग्णालयात कोरोना बाधित रुग्णांची भेट घेतली. रुग्णांकडे उपचाराविषयी जेवण व इतर मूलभूत सुविधांविषयी   विचारणा केली. त्यानंतर  श्रीवर्धन नगरपरिषदेच्या नगराध्यक्षांच्या दालनात स्थानिक लोकप्रतिनिधींशी संवाद साधला. सदर प्रसंगी त्यांनी सांगितले  कायद्याचा भंग करणाऱ्या व्यक्ती विरोधात तात्काळ गुन्हे दाखल करा.  कोरोना चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता लोकप्रतिनिधींनी कठोर भूमिका घेणे गरजेचे आहे असे सांगितले.  


त्यासोबत नगरपरिषद हद्दीमधील सर्व नगरसेवकांनी आप आपल्या प्रभागातील कोरोना बधित व्यक्तींची माहिती तात्काळ प्रशासनाला देणे गरजेचे आहे त्यासोबत बाधित कोरोना ग्रस्त व्यक्तीच्या गृह विलगीकरण कालावधी दरम्यान  संबंधित व्यक्ती  घराच्या बाहेर पडणार नाहीत याविषयी त्याच्याशी संवाद साधावा. कोरोना बाधित व्यक्तीच्या हातावरती शिक्का मारावा. असे अदिती तटकरें यांनी सांगितले. आजमितीस जिल्ह्यासाठी  10000 लस दिली जाते  त्यापैकी 3000 लस पनवेल साठी वापरले जाते . उर्वरित 7000 लस पंधरा तालुक्यासाठी दिली जाते. लसी संदर्भात लवकरच मुबलक साठा उपलब्ध होईल. आपण सर्वांनी मिळून  कोरोना संदर्भात जागरूक असणे गरजेचे आहे  असे अदिती तटकरे यांनी सांगितले.  सदर प्रसंगी प्रांताधिकारी अमित शेडगे, तहसीलदार सचिन गोसावी, मुख्याधिकारी किरण कुमार मोरे, डॉक्टर मधुकर ढवळे, गटविकास अधिकारी उद्धव होळकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर पांडे, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष   दर्शन विचारे ,नगराध्यक्ष फैसल हूर्झुक आदी मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा