फोटो- म्हसळा ग्रामीण रुग्णालयात कोरोना लसीचा पहिला डोस घेताना तहसीलदार शरद गोसावी दिसत आहेत.छाया-निकेश कोकचा
म्हसळा(निकेश कोकचा)
म्हसळा तहसीलदार शरद गोसावी व तहसील कार्यालयातील ५४ कर्मचार्यांनी कोरोनाची लस घेतली आहे.म्हसळा ग्रामीण रुग्णालयात तहसीलदार व कर्मचार्यांनी कोव्हीशिल्डचा पहिला डोस घेतला आहे.
कोरोना विषाणूंचा धोका लक्षात घेऊन भारतीय वैद्यानिकांनी कोरोना विषाणूंचा संसर्ग टाळण्यासाठी एन्टी लस तयार केली आहे.राज्यामध्ये कोरोना लसीकरणाची मोहीम आता वेगवान झाली आहे.या मोहिमे अंतर्गत म्हसळा ग्रामीण रुग्णालय व मेंदाडी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये फ्रंट लाईन वर्कर,६० वर्षा पुढील वयोवृद्ध व ४५ ते ६० वयोगटातील हृदयविकार,ब्लड प्रेशर,डायबेटीस असणाऱ्या नागरिकांना लस देण्याचे काम सुरु आहे. म्हसळा ग्रामीण रुग्णालयात आतापर्यंत ११० नागरिकांनी कोव्हीशिल्डचा पहिला डोस तर ३ नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. मेंदडी प्राथमिक आरोग्य केंद्रात १३१ नागरिकांनी कोव्हीशिल्डचा पहिला डोस घेतला आहे. म्हसळा ग्रामीण रुग्णालयात २०० तर मेंदडी प्राथमिक आरोग्य केंद्रात ७० कोव्हीशिल्डचचे डोस शिल्लक आहेत.
तहसीलदारांचे नागरिकांना आवाहन-
कोरोनाची लस सुरक्षित व प्रभावशाली असल्यामुळे लसीविषयक असणारे गैरसमज नागरिकांनी मनामधून काढून टाकावे व शासनाच्या नियमानुसार लसी साठी पात्र असणाऱ्या नागरिकांना न विसरता लस घ्यावी असे आवाहन म्हसळा तहसीलदार शरद गोसावी यांनी कोरोनाची लस घेतल्या नंतर केले.
हॉटेल मालक निघाला कोरोना संक्रमित-
म्हसळा तालुक्यात कोरोनाचे पुनरागमन झाले असून, शहरापासून ३ ते ४ किलोमीटर पुढील अंतरावर असणाऱ्या एका हॉटेलचा मालक कोरोना संक्रमित झाला आहे.म्हसळा बझारपेठ मध्ये ९० टक्के नागरिक अद्यापही कोरोना बाबत नियम पाळत नसून विनामास्क फिरताना दिसतात. यामुळे काही दिवसातच म्हसळा तालुक्यात कोरोनाची मोठा विस्फोट होण्याची शक्यता जाणकारांनी वर्तवली आहे.
إرسال تعليق