म्हसळा शहरात युवासेना सदस्य नोंदणीचा शुभारंभ



म्हसळा (बाबू शिर्के)

युवासेना  सदस्य नोंदणी अभियानाचा उपक्रम राज्यभरात राबवण्यात येत असून युवासेना म्हसळा शहरातर्फे शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाजवळ सदस्य नोंदणी अभियानाचा प्रारंभ करण्यात आला.या प्रसंगी ज्येष्ठ शिवसैनिक भाऊ करडे, माजी तालुका प्रमुख नंदू शिर्के, शहर प्रमुख अनिकेत पानसरे, युवासेना तालुका अधिकारी अमित महामुनकर, सुरेश कुडेकर, शहर अधिकारी कौस्तुभ करडे, उपशहर अधिकारी राहुल जैन, अजय करंबे, उपशहर प्रमुख अक्रम साने, विशाल सायकर, कल्पेश जैन, दुर्गेश खताते आणी युवसैनिक उपस्थीत होते.
                   यावेळी माजी तालुका प्रमुख नंदू शिर्के बोलतांना म्हणाले की युवकांच्या प्रश्नांची जाण युवासेनेला नक्कीच आहे.युवकांच्या समस्या सोडवण्यात युवासेनेचची भूमिका नेहमी सकारात्मकच राहिली असल्याने युवासेनेकडे सामान्य माणसासोबतच युवकांचाही ओघ वाढला आहे. जास्तीत जास्त सभासद नोंदणी करण्याचे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले.युवासेनेच्या  माध्यमातून सामाजिक क्षेत्रात काम करू इच्छिणाऱ्या तरुण तरुणींनी पुढे यावे. असे आव्हान यावेळी शहर अधिकारी कौस्तुभ करडे यांनी केले.म्हसळा तालुक्यातील तरुण तरुणींनी अधिकृतरित्या युवासेनेचे  सदस्य म्हणून स्वतःची नोंदणी करून पक्ष संघटनेच्या माध्यमातून या क्रांतिरुपी युवकांच्या प्रश्नाच्या लढाईत उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे असे आवाहन तालुका अधिकारी अमित महामुनकर यांनी केले.

Post a Comment

أحدث أقدم

नक्की वाचा