तळा (किशोर पितळे) शिववडापाव व झुणका भाकरी केंद्राचे उद्घघाटन दक्षिण रायगड जिल्हा प्रमुख मा.अनिलजी नवगणे यांच्या हस्ते आज १मार्चरोजी १२.३०वा.करण्यात आले.यावेळी माजी जिल्हा प्रमुख
प्रमोदजी घोसाळकर, तालुका प्रमुख राकेशजी वडके, माजी उपनगराध्यक्षा सायली खातू माजी गटनेते अँड चेतन चव्हाण, माजी जेष्ठ नगरसेवक विठोबा चांडीवकर डॉ. मनोज पाथरे डॉ. कविता पाथरे जेष्ठ शिवसैनिक डॉ. चंद्रकांत विचारे जेष्ठ पत्रकार किशोर पितळे महीला शहर संघटकनम्रता पाडळकर, शिव सैनीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.उद्घाटन प्रसंगी अनिल नवगणे म्हणाले कि.पैसे सर्वजण कमवतात पण त्याचा वापर नियोजन बध्द करणे महत्त्वाचे आहे व दानशूर पणा असावा लागतो. त्या बरोबरच समाजाचे काही तरी देणे लागतोयाभावनेतून डॉ. पाथरे यांनी शिववडापाव व झुणका भाकरी केंद्र सुरु करून खेडेगावातील गोरगरीबजनतेलाशासकीय कामासाठी,औषधोपचारासाठी शहरात यावे लागते त्याचीभुक शमविण्यासाठी वडापाव, किंंवा झुणका भाकरी खावून मिटणार आहे. कमी दरात उपलब्ध करून वस्वच्छ पाणी पाण्याची सोय केली आहे.हि जनसेवाकेली आहे.भाजप पक्षाला राम राम करून शिवसेनेचे कार्यप्रणाली वर प्रेरीत होउन सेनेचे झाले आहेत.पक्ष नेहमी पाठीशी असेल असे आश्वासन दिले. येत्या नजीकच्या काळात नगरपंचायतीच्या सर्वच्या सर्व जागा मिळवून पुन्हा सत्ता द्या. महाआघाडीची सत्ता असल्याने रखडलेला विकास पुर्ण करूअसे उध्दघाटन प्रसगी जनतेलाआवाहन केले डॉ.पाथरे यांनी मनोगत व्यक्त करताना म्हणाले कि शिवसेना पक्षाच्या कार्यप्रणाली वर प्रभावीत होऊन पक्ष प्रवेश केला.या पक्षाने तळावासियांसाठी जवळपास १० कोटींची वावे धरणातून पाणी स्किम मंजूर करून आणली मी भाजप मध्ये असताना वरीष्ठकांकढे कामे सांगीतली ती केली नाही का.तर स्थानिक पातळीवर सत्ता नसल्याने केली गेली.हिंदु ह्दय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे. माँ साहेब यांचे स्मृति स्मारक उभेरहाण्यासाठी मी प्रयत्नशील आहे ते लवकर कसे पूर्ण केले जाईल असे यावेळी मत व्यक्त केले.
إرسال تعليق